Breaking News
नवी मुंबई ः घणसोली महिला सक्षमीकरण केंद्राजवळ डेब्रिज टाकले जात असल्याची तक्रार महानगरपालिकेस व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या निर्देशानुसार त्वरित कार्यवाही करीत दोन डंपर वाहने जप्त केली आहेत. या वाहन मालकांकडून प्रत्येकी रु. 30 हजार याप्रमाणे एकूण रु. 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यास येत आहे.
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे याकरिता नागरिकांचे सक्रिय योगदान अपेक्षित असून नागरिकांनी बांधकाम सुरु असल्यास आपले पाडकाम साहित्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी असलेल्या सी ॲन्ड डी वेस्ट प्रकल्पाठिकाणी दयावे असे आवाहन नागरिकांना करतानाच डेब्रिजव्दारे शहर विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांच्या विरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai