Breaking News
नवी मुंबई : सखोल स्वच्छता मोहीमा राबवितांना रस्त्याच्या कडेला असलेली माती उचलून स्वच्छतेसोबतच हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून 13 डिसेंबर ते 2 जानेवारी कालावधीतील स्वच्छता पंधरवड्यानंतरही विभागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह तसेच सुरु ठेवण्यात आले आहेत.
यामध्ये वाशी विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली से.10 येथील मिनी सीशोअर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि पर्यटन स्थळ म्हणून गजबजलेला हा परिसर सखोल स्वच्छ करण्यात आला. त्यासोबतच शनिवारी व सोमवारी वाशी विभागातील सायन पनवेल महामार्गाचा भागही सखोल स्वच्छ करण्यात आला. अशाच प्रकारची मोहीम कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे यांच्या नियंत्रणाखाली महापे गाव व परिसरात राबविण्यात आली. या अंतर्गत महापे गाव व गावठाण येथील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत वाटा आणि परिसर यामध्ये डीप क्लिनिंग करण्यात आली. बेलापूर विभागामार्फत सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली अपोलो सिग्नलपासून नमुंमपा मुख्यालयापर्यंत आम्रमार्गावर सखोल स्वच्छता करण्यात आली. उरण, उलवे व जेएनपीटी कडे जाणाऱ्या जड वाहनांची या रस्त्यावरुन मोठया प्रमाणावर रहदारी नियमित सुरु असल्याने याठिकाणी माती व रेती रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणावर जमा होताना दिसते. त्यादृष्टीने या रस्त्याची नियमित सखोल स्वच्छता करण्याचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी केली जात आहे. याअंतर्गत रस्त्याच्या कडेला जमा खडी, धूळ, माती उचलून घेण्यात आली तसेच मॅकेनिकल स्वीपिंग मशीनव्दारे पदपथावर व कडेला पाणी मारुन धुळीला अटकाव करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai