Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरीता मा.सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने “क्रीडा शिष्यवृत्ती“ लागू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सन 2023-2024 मधील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याकरीता पात्र खेळाडूंनी “क्रीडा शिष्यवृत्ती“ करीता विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता दि.20 फेब्रुवारी 2025 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाकडे सादर करावी. असे जाहीर आवाहन महापालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत असून विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी बेलापुर येथील क्रीडा विभागात तसेच संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी नवी मुंबईतील पात्र खेळाडूंनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai