Breaking News
1300 हून अधिक रहिवासी उपस्थित
नवी मुंबई ः गत आठवड्यात ठाण्यातील एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईसह, ठाणे व पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. त्यानंतर रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात तब्बल 11 वर्षांनी गणेश नाईक यांनी पुन्हा पहिला जनता दरबार आयोजित केला होता. या उपक्रमाला 1300 हून अधिक रहिवासी उपस्थित होते. तब्बल सव्वा सात हा कार्यक्रम सुरु होता. यामध्ये आलेल्या सर्व तक्रारींचे, समस्यांचे निराकरण केले जाईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
वनमंत्री गणेश नाईक यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या नवी मुंबईतील नागरिकांनी रविवारी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृह फुलून गेले होते. सकाळी 10 वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालला. नागरिकांना या कार्यक्रमाबद्दल काही दिवस आधीच माहिती देण्यात आली होती आणि त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तसेच त्यांच्या तीन छायाप्रती संबंधित विभागाला पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरबारात नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (एमएसईडीसीएल), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), वन, पोलिस आणि तहसीलदार कार्यालये यासारख्या विभागांचे प्रतिनिधी होते, प्रत्येक विभागातील किमान चार अधिकारी उपस्थित होते. मंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांसह नागरिकांच्या तक्रारी स्वतः ऐकल्या. लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या जातील आणि त्यांना एका महिन्याच्या आत योग्य प्रतिसाद दिला जाईल, असे ते म्हणाले.
नवी मुंबईतील अडचणींवर मात करण्यासाठी हा जनता दरबार होता. काही अधिकारी स्वत: च्या स्वार्थासाठी नौटंकी करतात असे नाईक म्हणाले. गावठाणाच्या बाहेर लोकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत असे नाईक म्हणाले. सिडकोनी घेतलेले ठराव आहे, सिडकोचे काही अधिकारी लोकांची लुबाडणूक करतात असे नाईक म्हणाले. मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे नाईक म्हणाले. सिडकोच्या ताब्यात असलेल्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्या फ्री होल्ड करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावणार आहेत. मोठ्या संख्येने गद झाल्याने नाट्यगृहातून बाहेर येत लोकांची निवेदने स्वीकारावी लागल्याचे नाईक म्हणाले.
मी मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा पहिलाच दरबार होता आणि येथून पुढे, मी वसई, वाडा, विक्रमगड, संपूर्ण पालघर जिल्हा, तसेच ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर यासारख्या इतर शहरांमध्ये अशाच प्रकारचे मेळावे आयोजित करेन. जिथे जिथे नागरिक त्यांच्या समस्या माझ्याशी शेअर करण्यास उत्सुक असतील तिथे मी त्यांच्यासाठी उपस्थित राहीन. नवी मुंबई हे माझे स्वतःचे शहर असल्याने, दर 15 दिवसांनी असे दरबार भरवण्याचा माझा मानस आहे. - वनमंत्री, गणेश नाईक
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai