Breaking News
दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या 15,358 शेतकर्यांचा समावेश
मुंबई : ठाकरे सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये 68 गावांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या 15,358 शेतकर्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानुसार आज कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली.
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. आता दुसरी यादी 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना दिले आहे. याशिवाय, राज्य सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत 34,83, 908 खात्यांची माहिती संग्रहित केली आहे. अजूनही 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. कर्जमाफीनंतर शेतकर्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai