Breaking News
समालखा : ‘विस्तार अनंताच्या दिशेने’ या मुख्य विषयावर आधारित 3-दिवसीय 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वचनांद्वारे यशस्वीरित्या सांगता झाली. मुंबई व महाराष्ट्रातून समागमामध्ये सहभागी झालेले सुमारे एक लाख भाविक भक्तगण समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करुन आपापल्या निवासस्थानी परतले. समालखा (हरियाणा) येथे निरंकारी आध्यात्मिक स्थळाच्या सुमारे 650 एकरांच्या विशाल मैदानावर आयोजित या समागमामध्ये देश-विदेशातील लाखो भाविक-भक्तगण सहभागी झाले होते.
समागमाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की जगामध्ये आपण जेवढ्या वस्तू किंवा पदार्थ पाहत व अनुभवत आहोत त्या सर्व परिवर्तनशील आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीला शाश्वत सत्य मानले जाऊ शकत नाही. जसे सूर्य मावळतो तेव्हा रात्र होते आणि रात्र सरली की पुन्हा सूर्योदय होतो. बालक म्हणून जन्माला आलेला मनुष्य हळूहळू शरीराच्या आकारात बदल घडून वृद्धत्वाकडे झुकतो. अशा तऱ्हेने प्रकृतीच्या कोणत्याही वस्तूचे अस्तित्व शाश्वत मानणे हा आपला भ्रम आहे. कारण सत्य केवळ एक निराकार परमात्मा आहे ज्याला विविध नावांनी पुकारले जाते. या सदोदित एकरस व अविनाशी परम सत्याला जाणून आपण भ्रमांपासून मुक्ती प्राप्त करु शकतो.
निरंकारी राजपिता जी यांचे संबोधन
तत्पूव, निरंकारी राजपिता रमित जी यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले, की 77व्या समागमामध्ये भाग घेणे ही भाविक भक्तगणांसाठी एक अनोखी पर्वणी आहे. हा समागम जीवनाला सखोलता आणि विस्तार प्रदान करत आहे. सद्गुरुंच्या शिकवणूकीने मानवी अस्तित्वाला असीम आणि गौरवशाली केले आहे. भक्ती केवळ साधन नसून साध्यही आहे. सतगुरुंकडून प्रदत्त आध्यात्मिकता आमचे विचार, आमची दृष्टि, आमचे प्रेम, सेवा, समर्पण, करूणा व अन्य दिव्य गुणांचा विस्तार करते. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी तीन दिवसीय 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तगणांना संबोधित करताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की परमात्मा अनंत आहे आणि त्याच्याशी जोडली जाणारी प्रत्येक गोष्ट अनंत होऊ लागते. ब्रह्मज्ञानाद्वारे परमात्म्याला जाणून जेव्हा आपण त्याच्याशी नाते जाडतो तेव्हाच या दिव्य यात्रेचा प्रारंभ होतो ज्यायोगे आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा सकारात्मक विकास होऊ लागतो. सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, की अज्ञानतेमुळे जगामध्ये भेदभावाची कित्येक कारणे शोधली जातात. आजकाल तर जाती-पाती व्यतिरिक्त जीवन शैली, शहरी अथवा ग्रामीण भागातील निवासी किंवा उच्चभ्रू व सामान्य वस्त्यांतील रहिवाशी अशा कारणांनी लोक भेदभाव करु लागले आहेत. त्याच वेळी दुसऱ्या बाजुला ब्रह्मज्ञानी संत परमात्म्याला जीवनाचा आधार मानून सहजपणे संकुचित भावनांच्या पलीकडे जाऊन समदृष्टीची सुंदर भावना धारण करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai