सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 08, 2024
- 405
नवी दिल्ली ः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. 8 नोव्हेंबर हा त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता. सर्वोच्च न्यायलयात आज त्यांचा निरोप समारंभ झाला, 10 नोव्हेंबरपासून ते अधिकृतरित्या निवृत्त होणार आहेत. मात्र महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल चंद्रचूड यांच्या कार्यकाळात लागला नाही. शिवसेना कोणाची याचे उत्तर न देताच धनंजय चंद्रचूड निवृत्त झाले आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निरोपासाठी औपचारिक खंडपीठ बसले होते. यामध्ये न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला, ज्येष्ठ वकील, न्यायमूर्ती संजीव खन्ना जे 10 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील ते देखील त्यांच्यासोबत सामील झाले. संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने संजीव खन्ना यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली. खन्ना यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकालही चंद्रचूड त्यांच्या कार्यकाळात देतील आणि भारतीय लोकशाही आणि राजकारणात एक मानदंड निश्चित करतील अशी अपेक्षा होती, मात्र धनंजय चंद्रचूड निवृत्त झाले मात्र आमदार अपात्रता आणि शिवसेना कोणाची याचा निकाल त्यांच्या कार्यकाळात आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधी देखील निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर नव्या सरन्यायाधीशांसमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा खटला चालणार आहे, पुढील सहा महिन्यात तरी हा निकाल लागणार का, याची आता शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्रासोबतच देशालाही उत्सूकता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai