Breaking News
मुंबई : राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्याने या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचे राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी ठरवलं. त्यानंतर अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्याने सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर अभियांत्रिकी, औषधनिर्मिती शास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक कोणताही बदल केला नसून, 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
राज्यभरात अंतिम वर्ष परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दरम्यान होणार्या सीईटी परीक्षा कशा देणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर होता. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे अखेर या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या समोरचा संभ्रम आता दूर करण्यात आला आहे. सीईटी प्रवेश परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या तिसर्या, चौथ्या तर काही सीईटी प्रवेश परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे जाहीर केले आहे. सीईटी परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र सीईटी सेलच्या ुुु.ारहरलशीं.ेीस या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.
सुधारित सीईटी वेळापत्रक
एलएलबी ( पाच वर्षे) - 11 ऑक्टोबर
एलएलबी (तीन वर्षे) - 2 आणि 3 नोव्हेंबर
बीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड - 18 ऑक्टोबर
बीएड/एमएड सीईटी - 27 ऑक्टोबर
एमपीएड सीईटी - 29 ऑक्टोबर
बीपीएड - 4 नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट 5 ते 8 नोव्हेंबर
एमएड - 5 नोव्हेंबर
एम-आर्च सीईटी - 27 ऑक्टोबर
एम-एचएमसीटी - 27 ऑक्टोबर
एमसीए - 10 ऑक्टोबर - 28 ऑक्टोबर
बी-एचएमसीटी - 10 ऑक्टोबर
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai