Breaking News
मुंबई ः केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जम्मू काश्मीर येथे विधानसभेची निवडणूक 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तीन टप्प्यांत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर, हरियाणा येथे 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून 12 ऑगस्टपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 12 ऑगस्ट रोजी निघेल. तर, 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यांत, 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात तर, 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. तर, हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया होऊन 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, संसदीय निवडणुकीनंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे आणि केंद्रशासित प्रदेशात लोकशाही बळकट झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 11 हजार 838 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, ज्यात 42.6 लाख महिलांसह 87.09 लाख मतदार आहेत, जे त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. जम्मू काश्मीरमध्ये 80 जागांसाठी मतदान होणार आहे.
हरियाणात केव्हा निवडणुका?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai