Breaking News
महाराष्ट्रात सर्वाधिक रिकव्हरी रेट
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गावर अद्याप नियंत्रण मिळवता आले नसले तरी काही दिलासा देणारे आकडे समोर आले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर घटला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. महत्वाचं म्हणजे देशात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सलग 8 दिवसांपासून 1000 पेक्षा कमी मृत्यूची नोंद होत आहे.
बरे झालेले अर्ध्याहून अधिक रुग्ण पाच सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यातले आहेत. देशाने आज आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला. देशात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 लाखांहून अधिक (60,77,976 ) झाली आहे. दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होत असून रुग्ण बरे होण्याचा वेग कायम आहे. देशात गेल्या 24 तासात 89, 154 रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या प्रमाणित उपचार प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि डॉक्टर, निमवैद्यकीय आणि आघाडीवर काम करणार्यांची समर्पित वृत्ती तसेच वचनबद्धता यामुळे दैनंदिन मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळत आहे. बरे होणार्यांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे. गेले सलग आठ दिवस नवीन मृत्यूची नोंद 1000 पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 918 मृत्यूंची नोंद झाली आहे.
देशातली सक्रिय (अॅक्टीव) रुग्णांची संख्या 8,67,496 आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतली घट कायम असून गेल्या तीन दिवसात ती 8 लाखांपेक्षा कमी आहे. कोविडमधून रुग्ण बरे होण्याचा (रिकव्हरी रेट) राष्ट्रीय दर आणखी वाढून तो 86.17 % झाला आहे. रुग्ण बरे होण्याच्या वाढत्या संख्येबरोबरच जगात सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होण्यातले अव्वल स्थान भारताने कायम राखले आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण (54.%), सर्वाधिक रुग्णसंख्या (सक्रिय रुग्णांपैकी 61%) असलेल्या 5 राज्यांमधले आहेत.
महाराष्ट्र अव्वल स्थानी
बरे झालेल्या रुग्णांच्या नव्या नोंदींपैकी 80% हे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि चंदिगड या 10 राज्यांमधले आहेत. यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून काल (शनिवार) 26 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai