
दररोज 15 हजार साईभक्तांना मिळणार दर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 06, 2021
- 736
दर्शन पासेस फक्त ऑनलाईन उपलब्ध
नवी मुंबई ः राज्य शासनाने 07 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज 15 हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून दर्शन पासेस हे फक्त ऑनलाईन उपलब्ध असतील. त्यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी केले.
07 ऑक्टोबर 2021 रोजीच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यात येणार असून सकाळी 06.00 ते रात्री 10.00 यावेळेत मंदिर खुले राहणार आहे. दिवसभरात 15 हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाणार असून हे सर्व दर्शन पासेस फक्त ऑनलाईन उपलब्ध असतील. यामध्ये 10 हजार निशुल्क व 05 हजार सशुल्क पासेस असतील. प्रत्येक तासाला 1150 साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल. तसेच प्रत्येक आरतीकरीता एकुण 75 साईभक्तांना आरतीसाठी प्रवेश देण्यात येणार असून 45 देणगीदार साईभक्त व 20 साईभक्तांना ऑनलाईनव्दारे उपलब्ध असेल. तसेच प्रत्येक आरतीस प्रथम येणार्या शिर्डी ग्रामस्थांना 10 पासेस देण्यात येतील. ग्रामस्थांना 10 आरती पासेस हे साईउद्यान निवासस्थान येथुन तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील 16 गुंठे शताब्दी मंडप येथील काऊंटरवर दिले जाणार असून ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व साईभक्तांनी दर्शनाकरीता जाताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे (06 फुट अंतर ठेवुन आखणी करणेत आलेले मार्कींग प्रमाणे) पालन करावे. मास्कचा वापर न करण्यार्या साईभक्तांना तसेच 10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व्यक्ती व आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्याची पालखी बंद राहील. याबरोबरच श्री साईप्रसादालय, मंदिरातील साई सत्यव्रत पुजा, अभिषेक पुजा, ध्यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.
दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर 02 मधुन प्रवेश दिला जाणार असून व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे 04 व 05 नंबर गेटव्दारे बाहेर पाठविले जाईल. ज्या साईभक्तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्यथा गैरसोय होऊ शकते. दर्शन पासेस वरील नमुद वेळे प्रमाणेच (स्लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमुद वेळेचे 15 मिनीटे अगोदर प्रवेशव्दारावर उपस्थित रहावे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai