खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


फुटला भ्रमाचा भोपळा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातलं महायुतीचं सरकार म्हणजे पाठशिवणीचा खेळ झाला आहे. या खेळात जो सहभागी झाला त्याला कधी सत्तेत चांगली फळं चाखायला मिळतील, तर ही फळं चाखण्यासाठी कुणाच्या किती मिनतवाऱ्या   कराव्या लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही. पळून जाऊन संसार मांडला की जे होतं तसंच सध्या राज्यातल्या शिंदे-अजित पवार  यांच  सुरू आहे. सत्तेत सहभागी झालेल्यांना आपल्यासाठी फडणवीसांनी खूप काही वाढून ठेवलंय, असंच वाटत होत पण पंगतीला बसल्यावर वाढलेल्या ताटात पक्वान्न शोधायची वेळ आली तेव्हाच ‘भरल्या' ताटावरून उठल्याची किंमत कळली. महायुतीच्या सत्तेत शिंदे यांना शह देण्यासाठी अजित पवारांचा ज्या पद्धतीने वापर केला जात आहे ते पहाता यापुढे त्यांना अशाच प्रकारे वापरले जाईल याचे भान आता पवारांना कायम लक्षात ठेवावे लागेल. उसन्या पंगतीवर बसणाऱ्यांचा मान कधीच राखला जात नसतो, जे ताटात पडेल ते निमूटपणे   ओरपायचे असते याची जाणीव अजित दादांना एव्हाना आली असेल. सत्तेत सहभागी झालात आता निमूटपणे सांगतो तसंच वागा असं सांगण्याची ही खेळी. ईडी व सीबीआय पासून संरक्षण हवे असेल तर शेपटी हलवल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव भाजप या दोन नेत्यांना पावलोपावली करून देत आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेंच्या गटाला फोडल्यानंतर त्यांच्या दिल्लीतील वाऱ्या वाढल्यावर फडणवीसांनी अजित पवारांना सत्तेत स्थान दिलं. शिंदे यांच्यापुढे हे नवं आव्हान होतं. केवळ सत्तेत सहभागी करून घेतलं नाही तर ज्या कारणास्तव बंडखोरी केली तेच अर्थखात पवारांकडे देऊन शिंदेंना योग्य संदेश दिला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला एकही मंत्रिपद न देऊन फडणवीसांनी त्यांना जागा दाखवली. अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतल्यावरही आगामी निवडणुकांमध्ये काही खरं नाही, याचे आकडे बाहेर येऊ लागल्याने अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवण्यात आलं व त्याबदल्यात शरद पवार आणि त्यांचा सारा पक्ष सत्तेत सहभागी झाला पाहिजे, अशी अट घालण्यात आली. पवारांपुढे मिनतवाऱ्या करूनही पवार बधले नाहीत. भाजपच्या पक्षफोडीच्या कृतीने घायाळ झालेल्या पवारांनी अजित पवारांना जराही किंमत दिली नाही. उलट भाजपबरोबर कधीच जाणार नाही, असं बजावत पवारांनी अजितदादांचे परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकले. हे होत नसल्याने पवारांविषयी संभ्रम निर्माण करण्याचे हरएक प्रयत्न भाजप व अजित पवार गटाने करून पाहिले. पवारच सत्तेचे वाटेकरी असल्याचं दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणाकडे बोट दाखवत भाजप व त्यांच्या आयटीसेलने पवारांची छबी बिघडवण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला. एकीकडे हेे सुरू असताना अजित पवार आमचेच नेते असल्याची सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची वक्तव्यं बाहेर आली आणि भाजपला हायसं झालं. यातून राज्यभर चलबिचल झाली. महाविकासचं काही खरं नाही, अशी उघड चर्चा सुरू होत असताना भाजप पुढे मोठं आव्हान उभारणाऱ्या इंडिया आघाडीतही बिघाडी होतेय की काय, अशा शंका घेतल्या जाऊ लागल्या. मात्र ही खेळी फारकाळ टिकली नाही. 

महाराष्ट्रातला वाढता विरोध कमी करण्याची भाजपची ही चाल महाविकास आणि इंडियाला मारक असल्याचं सारा देश ओळखून होता. शिवसेनेच्या मुखपत्राने तर टीकेची झोड उठवत महाविकास म्हणजे खेळ नाही, असं पवारांना बजावलं. काय तो एकदाचा निर्णय घ्या असं सांगत सेनेने पवारांना जे काय सांगायचं ते सांगून टाकलं.  सेनेची ही भूमिका पवारांच्या वर्मी लागली. सहकाऱ्यांकडून संशय व्यक्त होऊ लागल्याने ठोस भूमिका घेण्यावाचून पवारांपुढे पर्याय राहिला नाही. राष्ट्रवादीची दारं अजित पवारांना कायम बंद असल्याचं जाहीर करून टाकलं. यामुळे अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली. इतकी की त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. यातच आपलं महत्व सरकारमध्ये वाढवण्यासाठीची त्यांची धडपड सुरु होती. मुख्यमंत्री शिंदे आजारपणाचं निमित्त करत सातारा येथे गेले असताना त्यांनी घ्यायच्या आढावा बैठका घेऊन त्यांनी सरकारमध्ये स्वत:चं महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला. विभागाच्या प्रधान सचिवांच्या बैठका घेत राज्याच्या आर्थिक परिस्थितीची जाण करून घेतली. हा म्हणजे अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अधिक्षेप होता. पण दिल्लीवाऱ्यानी मोदी-शहांबरोबर संधान वाढवून आपल्या वरचढ होऊ पाहणाऱ्या शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी न बोलून उट्ट काढण्यासाठी अजित पवार यांचा व्यवस्थित वापर करून घेतला.

हळूहळू अजित पवारही आपल्या डोक्यावर मिरी वाटू लागल्याचं फडणवीसांच्या लक्षात येऊ लागलं. अर्थविषयक निर्णय घेताना अजित पवार मुख्यमंत्री शिंदे व आपल्यालाही विश्वासात घेत नाहीत, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलंच होतं. पवारांच्या असल्या कामाच्या पद्धतीची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. त्यात भर पडली ती राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर देखरेख ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमची. वॉर रुमच्या धर्तीवरच नव्याने मॉनिटरिंग कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न पवारांनी करून पाहिला. साखर कारखान्यांच्या मार्जीन मनी कर्ज प्रकरणात परस्पर नव्याने अटी घालण्याचा निर्णय त्यांनी अर्थमंत्री म्हणून घेतला. हे निर्णय शिंदे आणि भाजपच्या मंत्र्यांच्याही पचनी पडले नव्हते. यामुळे मंत्रिमंडळात उघड नाराजी होती. आपल्या कारभारात वित्त विभागाकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याच्या शिंदे गटाच्या तक्रारीही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचल्या. अजित पवारांची ही दादागिरी महाविकास आघाडीतले आमदार निमूट सहन करत होते. कारण तिथे पवारांचीच जादू चालायची. ती महायुतीत चालेलच असं नाही.

भाजपची सत्ता हे काय प्रकरण असतं, हे अजित पवारांना ठावूक नव्हतं असं नाही. पण आपलं महत्व वाढवण्यासाठी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. याचे व्हायचे ते परिणाम झाले. अजित पवारांना धोबीपछाड देण्यासाठी अर्थखात्याने नाकारलेल्या फाईली यापुढे थेट मुख्यमंत्र्यांना न पाठवता त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतच पाठवल्या जाव्यात असा फतवा निघाला. पवारांसाठी हा मोठा धक्काच होता. महाविकास आघाडीचा उपमुख्यमंत्री आणि महायुतीचा उपमुख्यमंत्री यातील फरक आज अजित पवारांना कळून चुकला असेल. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत सरकारमध्ये मानसन्मान प्रतिष्ठा मिळत असूनही पवारांनी भरल्या ताटावरून उठून भाजपच्या आभासी पंचपक्वान्न पंगतीला  बसण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या आता चांगलाच अंगाशी आला आहे. पंगतीला बसण्याचा मान मिळाला पण  ताटात काय वाढले व त्यासाठी काय किंमत मोजली याचे भान जेव्हा पंगतीवरून उठवले जाईल तेव्हाच येईल. देवेंद्र फडणवीस यांची काम झालं की दूर लोटण्याची कला त्यांना ठावूक नव्हती असं नाही. आपण काकांकडून काहीही शिकलो नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आणि पायापुरते पाहून निर्णय घेणाऱ्या अजित पवारांचा भ्रमाचा भोपळा एव्हढ्या लवकर फुटेल असे मात्र कोणाला वाटले नव्हते...... 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट