Breaking News
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शुक्रवारी प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. आता पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. 34 वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील. ठाकरेंच्या वकिलांनी काल पुन्हा एक नवा अर्ज केला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. 25 ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 26 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल.
विधानसभा राहुल नार्वेकरांसमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये आज एकत्रित असे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 34 याचिका आहेत. याच 34 याचिकांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 1 ते 16 ठाकरे गटाच्या याचिका असतील. एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली असल्याची माहिती वकिलांनी दिली. ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सुप्रीम कोर्टातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवाद आहे. इथे प्रक्रिया आहे. इथे ट्रायल होते, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी नाराजी वक्त केली. दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला.जर मी सुनावणी घेत आहे. तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचना राहुल नार्वेकरांनी दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai