Breaking News
सीएआर टी-सेल थेरपीद्वारे नवी मुंबईत 3 रुग्णांवर यशस्वी उपचार
नवी मुंबई ः अपोलो कॅन्सर सेंटर्स (एसीसी) 3 रुग्णांवर सीएआर टी-सेल थेरपी यशस्वीपणे करुन भारतातील पहिले खाजगी रुग्णालय म्हणून नावारुपाला आले आहे आणि या प्रक्रियेत विकास घडवून आणण्यासाठी हे रुग्णालय ‘मेड इन इंडिया' सीएआर टी-सेल थेरपी सुरु केले आहे.
हे सीएआर विशेषतः असे प्रोटीन ओळखण्यासाठी तयार केले जातात, जे कर्करोगाच्या पेशींचे निर्मूलन करण्यास सज्ज होतात. त्यानंतर त्याद्वारे अनेक डोस तयार केले जातात आणि थेट रुग्णाला दिले जातात. आव्हानात्मक असा बी-सेल घातक रोग असलेल्या रुग्णांच्या जीवनात सीएआर टी-सेल थेरपीद्वारे अमुलाग्र सकारात्मक बदल घडवून आणला गेला, म्हणून या थेरपीला जागतिक मान्यता मिळाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, जगभरातील सुमारे 25,000 रुग्णांना या थेरपीचा लाभ झाला आहे.
व्यावसायिक स्तरावर सीएआर टी-सेल थेरपीचा वापर करत 3 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन बी-सेल लिम्फोमा आणि ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया विरुद्धच्या लढ्यात आम्ही जणू एक उंच भरारी घेतली आहे. या यशामुळे या आव्हानात्मक समस्यांचा सामना करणाऱ्या रूग्णांना नवीन आशा देण्याकरिता या परिवर्तनीय थेरपीची प्रभावीता आणि क्षमता सिद्ध होते. - डॉ.पुनित जैन, सल्लागार हेमॅटोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर्स
सीएआर टी-सेल या परिवर्तनीय थेरपीद्वारे 3 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करणारे आमचे रुग्णालय हे भारतातील पहिले खाजगी रुग्णालय ठरले आहे. - संतोष मराठे, सीईओ-पश्चिमी विभागाचे प्रादेशिक, अपोलो हॉस्पिटल्स
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai