Breaking News
नवी मुंबई ः सहकार भारती स्थापना दिनाच्या निमित्ताने आगरी कोळी भवन नेरूळ या ठिकाणी 11 जानेवारी रोजी गृहनिर्माण संस्थांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम व बचत गटांचे प्रदर्शन अतिशय उत्साहात पार पडले. यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र बचत गट प्रकोष्टप्रमुख जया अलीमचंदानी व नवी मुंबई बचत गट प्रकोष्टप्रमुख मंजू गुप्ता यांनी आयोजित केलेल्या बचत गटाच्या प्रदर्शनाने झाली. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महामंत्री विवेक जुगादे यांनी अतिशय सुंदरपणे आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे कौतुक केले त्याचप्रमाणे भविष्यात बचत गटांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयराव जोशी, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीशजी मराठे, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपनिबंधक प्रताप पाटील, भास्कर म्हात्रे, सचिव नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन तानाजी कवडे, प्रसिद्ध उद्योगपती सुरेश हावरे, भारतीय जनता पाटचे निलेश म्हात्रे, मोहन गुरणानि या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार भारती संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी जागतिक तापमान वाढ या संदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. राष्ट्रीय अध्यक्ष उदयराव जोशी यांनी सहकार भारतीच्या कार्यामागची संकल्पना प्रेरणा सहकार भारती कार्याची आवश्यकता सांगितली. प्रदेश महामंत्री विवेक जगादे यांनी सहकार भारती करत असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवी मुंबई अध्यक्ष प्रमोद जोशी यांनी केले. प्रमोदिनी प्रास्ताविकामध्ये नवी मुंबईमध्ये गृहनिर्माण संस्थांना भेडसावत असणाऱ्या प्रश्नांचा उल्लेख केला. नवी मुंबईमध्ये भविष्यात सहकाराच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी अशा सहकार भावनांची आवश्यकता अध्यक्षांनी व्यक्त केली. कार्यक्रमांमध्ये भास्कर म्हात्रे, उदय वारुंजीकर, अभिवक्ता परब साहेब या सर्वांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai