Breaking News
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी नशामुक्तीचा नारा देत ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात केली. याचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, प्रसिद्ध अभिनेते व अभियानाचे ॲम्बेसेडर जॉन अब्राहम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी यापुढे कुणीही व्यक्ती नशेला बळी पडू नये यासाठी विशेष मोहिमांची आखणी केली जात असल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच महाराष्ट्रात ड्रग्जविरोधी अभियान राबवले जात असून, त्याची सुरुवात नवी मुंबईतून होत असल्याचे ते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले. जागतिक पातळीवर देश बलशाली होत असतानाच, देशाच्या प्रगतीवर हल्ला करू पाहणाऱ्या अदृश्य शक्तींकडून ड्रग्जच्या आहारी ढकलून देशाचे भवितव्य उद्ध्वस्त केले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पंजाबसारख्या सीमावत राज्याची तरुणाई ड्रग्समुळे कमकुवत करण्याचे काम सुरू आहे. देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या. ही देखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे कॅनडासारखा देश सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला आहे. मात्र भारत सजग राहून नशेविरोधातील ही लढाई जिंकू शकतो, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि ‘नशामुक्त नवी मुंबई’ या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे महाविद्यालयीन विद्याथ, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचे जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात मोठया प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या आफ्रिकन देशातील नागरिकांकडून अमली पदार्थाचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी यासंबंधी मोठ्या प्रमाणावर मोहीमा हाती घेऊन ही साखळी मोडून काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे, असे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी स्पष्ट केले.
काय आहे अभियान ?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai