Breaking News
नवी मुंबई : वाशीतील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने ब्लड डिसऑर्डर क्लिनिक लाँच केले आहे. या केंद्रात रक्त-संबंधित आजारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन करण्यात येणार आहे. फोर्टिस इन्स्टिट्यूट ऑफ ब्लड डिसऑर्डर्सचे संचालक डॉ. सुभप्रकाश सन्याल यांच्या नेतृत्वात या युनिटचे राज्यातील बिझनेस हेड डॉ. एस. नारायणी आणि रुग्णालयाचे (वाशी) फॅसिलिटी डायरेक्टर नितीन कमारिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
फोर्टिस इन्स्टिट्यूट ऑफ ब्लड डिसऑर्डर्सची उपशाखा ब्लड डिसऑर्डर क्लिनिक मल्टीपल मायलोमा, ल्युकेमिया व इतर गंभीर हेमॅटोलॉजिक स्थितींसारख्या जीवघेण्या ब्लड कॅन्सर्ससाठी, तसेच ॲनिमिया आणि हेमाटोमोमास सारख्या कर्करोग नसलेल्या रक्त विकारांसाठी विशेष काळजी प्रदान करेल. याव्यतिरिक्त क्लिनिक अत्याधुनिक सीएआर टी-सेल थेरपी उपलब्ध करुन देणार आहे. ही उपचार पद्धत विशिष्ट प्रकारच्या ब्लड कॅन्सर्सच्या रुग्णांसाठी नवीन आशा देते. फोर्टिस इन्स्टिट्यूट ऑफ ब्लड डिसऑर्डर्सचे संचालक डॉ. सुभप्रकाश सन्याळ ब्लड डिसऑर्डर क्लिनिकचे नेतृत्व करण्यासाठी कन्सल्टण्ट-हेमॅटोलॉजी डॉ. हमझा दलाल आणि स्पेशालिस्ट्सच्या टीमसोबत सहयोगाने काम करतील, ज्यामुळे रूग्ण व त्यांच्या केअरगिव्हर्सना समर्पित केअर आणि सपोर्ट मिळेल. या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना सर्वात प्रगत उपचार, विद्यमान सपोर्ट आणि आपुलकीचे वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईमधील हा अद्वितीय प्रोग्राम रूग्णांसाठी उपचाराकरिता सुरक्षित स्पेस असण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, असे फोर्टिस हॉस्पिटल्सच्या बिझनेस हेड डॉ. एस. नारायणी म्हणाल्या.
हे क्लिनिक अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या आणि सरावांतर्गत असलेल्या उपचार क्षेत्रात दुर्मिळ व बहुमूल्य संसाधन देते. गुंतागूंतीचे विकार आणि ल्युकेमिया किंवा मल्टीपल मायलोमा यांसारख्या जीवघेण्या स्थितींचा सामना करत असलेल्या रूग्णांसाठी विशेषीकृत केअर उपलब्ध असणे फक्त गरज नसून लाइफलाइन आहे. ब्लड डिसऑर्डर क्लिनिक या दुर्मिळ व आव्हानात्मक स्थितींची सखोल माहिती असण्यासोबत अचूकता, समर्पितता आवश्यक असलेल्या क्षेत्रात तज्ञ उपचार देईल, असे डॉ. सुभप्रकाश सन्याल म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai