Breaking News
अभय कुरूंदकर दोषी; 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार
पनवेल ः बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा तब्बल 9 वषनी अंतिम सुनावणी संपली असून न्यायालयाने बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे जाहीर केले आहे. कुरुंदकरला दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारी पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद आणि बिद्रे कुटूंबियांचे मत ऐकल्यानंतर न्यायाधीश पालदेवार यांनी अंतिम निकाल राखून ठेवला आणि पुढील शिक्षेची सुनावणी 21 एप्रिल रोजी देण्याचे जाहीर केले. सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी कुरुंदकर याला फाशीची शिक्षा सूनावण्याची मागणी केली. (पान 7 वर)
अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांची 2015 मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती. यामुळे बिंद्रे यांच्या पतीने उच्च न्यायालयाचे दरवाडजे ठोठावले. उच्च न्यायालयाने अश्विनी बिंद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. अश्विनी व अभय कुरूंदकर या दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. हे दोघेही त्यापूवच विवाहित होते व त्यांना पत्नीसह मुले होती. बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव कुरूंदकर याने रचला. याप्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिंद्रे हिची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणा अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे केले. हे तुकडे काहीकाळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्याटप्यानं फेकून दिले. मात्र शेवटपर्यंत त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले नव्हते. याप्रकरणी अभय कुरुंदकरला 7 डिसेंबर 2017 रोजी तर दुसरा आरोपी राजू पाटीलला 10 डिसेंबर 2017 रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भंडारी आणि फळणीकर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. सर्व आरोपींविरोधात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai