Breaking News
गतवषीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक मात्र वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची चिंता
मुंबई ः मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा चढला असून राज्यातील अनेक भागात तापमान वाढले आहे. परिणामी पाणीसाठ्यातील बाष्पीभवनदेखील वेगाने होत असल्याने धरणे, तलाव, यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यंदा मुंबई वगळता राज्यातील सर्वच जलाशयांमध्ये गतवषच्या तुलनेत जास्त पाणीसाठी शिल्लक आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे तो पाऊस पडेपर्यंत पुरवण्याचे आव्हान त्या-त्या भागातील प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
राज्यात नागपुर, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे या सहा प्रदेशांमध्ये एकुण 2997 धरणे आहेत. यामध्ये 40498.41 द.श.घ.मी. पाणीसाठा क्षमता असून त्यात सध्या 17194.30 एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवष याच सुमारास यामध्ये 35.92% पाणीसाठा शिल्लक होता जो यंदा 42.46% एवढा आहे. गेल्यावषच्या तुलनेत यंदा धरणांत 10 टक्के जास्त पाणीसाठा असला तरी वाढणाऱ्या तापमानामुळे ते पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत मात्र गेल्यावषच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे असलेला कमी पाणीसाठा पुढील 2 ते 3 महिने काळजीपूर्वक वापरण्यासाठी प्रशासनाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर मुंबईवर पाणीसंकट ओढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
राज्यभरात 138 मोठे प्रकल्प, 260 मध्यम प्रकल्प तर 2599 लघु प्रकल्प असे एकुण 2997 धरणे, जलाशय प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये गतवषच्या आजच्या तारखेच्या तुलनेत 6 ते 10 टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये गेल्यावष आजच्या तारखेला 33.95 % असणारा पाणीसाठा यावष 41.94 % एवढा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये तो 46.56% एवढा होता जो आता 49.78 % एवढा आहे. लघु प्रकल्पांमधील पाणीसाठी 35.70% होता जो आता 38.20% आहे. मात्र ही बाब दिलासा देणारी असली तरी दुसरीकडे वाढणाऱ्या तापमानामुळे हा साठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरवणे जिकरीचे जाणार आहे. त्यात मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलप्रकल्पांमध्ये गेल्यावषच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे. एकुण पाणीसाठ्यापैकी निम्म्याहुन कमी पाणी शिल्लक राहीले आहे. त्यामुळे पाऊस पडून धरणातील पाणी साठ्यात वाढ होत नाही तोपर्यंत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे कठीण जाणार आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र अजुनही 60 टक्के मुबलक पाणी शिल्लक असल्याने तो ऑगस्टपर्यंत पुरणार असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील पाणीसाठ््याची स्थिती
भातसा 47.57 %
मोडकसागर 42.97 %
तानसा 37.09%
मध्य वैतरणा 37.55 %
सर्व धरण प्रकल्प
नागपुर 42.51%
अमरावती 50.76
छत्रपती संभाजीनगर 41.48%
नाशिक 44.64%
पुणे 37.83%
कोकण 50.53%
एकुण 42.46%
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस