
बाजारात एसीची चलती
- by Aajchi Navi Mumbai
- May 07, 2022
- 597
एकाच महिन्यात साडेसतरा लाख एसी युनिट्सची विक्री
मुंबई ः राज्यभरात उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे थंडावा कसा मिळेल याकडे नागरिकांचा कल असून एसी, कुलर यांची मागणी वाढली आहे. एप्रिलमध्ये सुमारे 17.5 लाख एअर कंडिशन युनिट्सची विक्री झाली आहे. एप्रिलमधील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (सीईएएमए) ने ही माहिती दिली. मागणी वाढली असली तरी पुरवठ्यात अडचणी येत असल्याने वाढ वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एप्रिल 2019 च्या तुलनेत या वर्षी विक्रीमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरून बाजार कोरोनाच्या दबावातून बाहेर आल्याचं दिसून येतं. या वर्षी सुमारे 90 लाख एसी युनिट्सची विक्री झाल्याचा अंदाज आहे. या वाढत्या मागणीसोबतच पुरवठ्याच्या आघाडीवरही काही आव्हानं असू शकतात. ‘सीईएएमए’ चे अध्यक्ष एरिक ब्रागांझा म्हणाले की काँप्रेसर आणि कंट्रोलरसारख्या घटकांच्या पुरवठ्यात समस्या आहेत. हे घटक प्रामुख्याने चीनमधून येतात. या कारणास्तव काही मॉडेल्सची मागणी कंपन्या पूर्ण करू शकत नाहीत. विशेषतः कमी ऊर्जेचा वापर करणार्या 5-स्टार एसीचं उत्पादन कमी असतं. ब्रागांझा यांनी भाव वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की ग्राहकोपयोगी उपकरणं/ टिकाऊ वस्तूंच्या उद्योगाने कच्च्या मालाच्या किमतीत वाढ केल्यामुळे आणि पेट्रोलियम महाग झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. येत्या काही महिन्यांमध्येही भावात दोन ते चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
देशभरातल्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा परिणाम एसीच्या बाजारपेठेवर झाला आहे. सध्याचा ट्रेंड पाहता मे आणि जूनमध्येही एअर कंडिशन युनिट्सना मागणी चांगली राहील, असा अंदाज आहे. 2022 च्या अपेक्षेबद्दल ब्रागांझा म्हणाले की, या वर्षी एसी मार्केट 85 लाख ते 90 लाख युनिट्सच्या श्रेणीत असेल अशी अपेक्षा आहे.
व्होल्टास, पॅनॉसॉनिक, हिताची, एलजी आणि हायरसारख्या उत्पादकांनी एप्रिलमध्ये विक्रमी विक्री केली. टाटा ग्रुप फर्म व्होल्टासचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रदीप बक्षी म्हणाले की, या वर्षी एसी विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आणि एप्रिल 2019 मध्ये आम्ही मोठ्या व्हॉल्यूम पातळीला स्पर्श केला. हा दशकातला सर्वात उष्ण उन्हाळ्यांपैकी एक होता. आम्ही संपूर्ण भागात उच्च तीन अंकी वाढ पाहिली आहे. ‘पॅनासॉनिक इंडिया’ चे एअर कंडिशनर्स ग्रुपचे बिझनेस हेड गौरव साह म्हणाले की आम्ही या एप्रिलमध्ये एक लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली, जी एप्रिल 2021 च्या तुलनेत 83 टक्क्यांनी तर एप्रिल 2019 च्या तुलनेत 67 टक्क्यांनी वाढली. मागणी वाढणं आणि उन्हाळ्याचा हंगाम सुरू होणं याला आम्ही या अभूतपूर्व वाढीचं श्रेय देतो. जॉन्सन कंट्रोल्स-हिताची एअर कंडिशनिंग इंडिया हिताची ब्रँडअंतर्गत निवासी एसी विकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये त्यांची विक्री जवळपास दुप्पट झाली.
- 2021 च्या तुलनेत दुप्पट विक्री
1. औद्योगिक स्तरावर, एप्रिल 2022 मध्ये निवासी एसी (एअर कंडिशनर्स) ची अंदाजे विक्री सुमारे 17.5 लाख युनिट्स आहे. एप्रिल 2021 च्या तुलनेत ही विक्री दुप्पट आहे आणि एप्रिल 2019 च्या आकडेवारीच्या तुलनेत 30-35 टक्के आहे.
2. व्होल्टास, पॅनॉसॉनिक, हिताची, एलजी आणि हायरसारख्या उत्पादकांनी एप्रिलमध्ये विक्रमी विक्री केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai