नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ
- by Aajchi Navi Mumbai
- May 09, 2025
- 276
नवी मुंबई : नगरविकास विभागाने महापालिकांना स्थानिक संस्था कर विभाग एप्रिल अखेरीस कायमचे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पालिकेतील स्थानिक स्वराज्य संस्था कर विभाग कायमचा बंद करून त्या विभागातील कामाकाजासह अधिकारी/कर्मचारी मालमत्ता कर विभागात समाविष्ट केल्याचे शासनाला कळवले आहे. यामुळे कर वसुली अधिकाऱ्यांची चंगळ झाली असून एकाच वेळी दोन विभागातुन वसुली करता येणार असल्याने मबींसो ऊंगली घी मे और सर कढाई मेफ अशी अवस्था झाली आहे. तसेच आयुक्तांनाही आता वसुलीचे लक्ष गाठणे सोपे जाणार आहे.
देशभरात 1 जुलै 2017 रोजी वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर जकात, स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय लागू होऊन बराच काळ उलटला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्थानिक संस्था कर विभाग सुरुच आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रक काढून सर्व महापालिकांमधील स्थानिक संस्था कर विभाग 30 एप्रिल 2025 पर्यंत कायमचा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे केलेल्या कार्यवाहीबाबत शासनाला कळविण्याचेही सुचित केले होते. त्यानुसार 6 मे 2025 रोजी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक संस्था कर विभाग कायमचा बंद करण्यात येत आहे. तसेच सदर विभागातील अधिकारी/कर्मचारी मालमत्ता करविभागात समाविष्ट करण्यात येत आहेत. पालिकेच्या आकृतीबंधातील कर विभागाअंतर्गत मालमत्ता कर विभाग व स्थानिकसंस्था कर विभाग आहेत. मात्र आता स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्यात आला आहे.
यापुढे मालमत्ता कर विभागाचे नाव मकर विभाग (मालमत्ता कर व इतर)फ असे राहील. तसेच स्थानिक संस्था कर विभागाकडील न्यायालयीन प्रकरणे व तद्नुषंगित इतर प्रकरण, प्रलंबित स्थानिक संस्था कर वसुलीबाबतचे कामकाज, अभिलेख यापुढे कर विभाग (मालमत्ता व इतर यांचेमार्फत हाताळण्यात येईल असे शासनास कळविले आहे.
पालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता कर वसुली विभागाला अधिक बळकटी मिळणार आहे. यावष प्रथमच पालिकेने 795 कोटीहून अधिक विक्रमी मालमत्ता कर वसूली केली आहे. आता दोन्ही विभाग एकत्र आल्याने मनुष्यबळामुळे कर वसुल करण्याच्या कार्यवाहीला अधिक गती मिळणार आहे. त्यामुळे आयुक्तांनाही वसुलीचे उदिष्ट साध्य करणे सोईचे जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai