सिडकोकडून फसवणूक सुरुच
- by संजयकुमार सुर्वे
- May 02, 2025
- 532
द्रोणागिरी व ऐरोली नोडमधील सीआरझेड बाधित भुखंडांची विक्री
नवी मुंबई ः सिडकोने त्यांच्या नोडमधील 57 भुखंडांची विक्रि करण्याची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. यातील द्रोणागिरी मधील भुखंड क्र. 47 व ऐरोली मधील भुखंड क्र. 34 हा सीआरझेडने बाधित असतानाही सिडकोने निविदा प्रक्रिया सुरुकेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापुवही सिडकोने अशाप्रकारची भुखंड विक्रि करुन अनेकांची फसवणुक केल्याची बाब समोर असताना पुन्हा एकदा सिडकोने अशाच प्रकारची निविदा काढल्याने विकासकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
नवी मुंबई विकसीत करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून 1971 साली महाराष्ट्र शासनाने सिडकोची नेमणुक केली. सिडकोने नवी मुंबईतील गावांलगत असलेल्या खाडीमध्ये भराव टाकून नवी मुंबई शहराची निर्मिती केली. परंतु, केेंद्र सरकारने 1991 पासून सीआरझेड कायदा लागू केल्यानंतर भरती रेषेच्या 100 मीटर अंतरात बांधकाम करण्यास बंदी करण्यात आली होती. असे असतानाही सिडकोने या कायद्याला फाट्यावर मारुन आपली विकासाची गंगा वाहतच ठेवली. सिडकोच्या या विकासाच्या गंगेत अनेक विकासक आणि प्रकल्पग्रस्त बुडत असून अजूनही अनेकांना घरे बांधूनही भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही.
सिडकोने द्रोणागिरी नोडमध्ये यापुव अशाचप्रकारे 91 भुखंडधारकांना सीआरझेड क्षेत्रात भुखंड वाटप केले होते. या भुखंड धारकांना सिडकोने बांधकाम परवानगीही दिली होती. अनेक विकासकांनी सदर भुखंडावरील सदनिका ग्राहकांना विकल्या आहेत. परंतु, सीआरझेड विभागाच्या दट्ट्यानंतर सिडकोने बांधकाम परवानग्या व भोगवटा प्रमाणपत्र बंद केले. मात्र या भुखंडधारकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी तत्कालीन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखज यांच्या विनंतीवरुन सीआरझेड विभागाने ना हरकत दाखला देण्याची समंती दिली. परंतु, यातील अनेक भुखंड 50 मीटर अंतराच्या आत असल्याने अजुनही सदर भुखंड हे भोगवटा प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत आहे. त्याचप्रकारे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही अनेक भुखंड सिडकोच्या कारनाम्यामुळे सीआरझेड बाधित असून पामबीच रेसिडेन्सी हा त्याचे जागते उदाहरण आहे.
सिडकोने हे कमी काय म्हणून नव्याने मागवलेल्या निविदेमध्ये द्रोणागिरी व ऐरोली येथील सीआरझेड बाधित भुखंडाचा समावेश केल्याने अनेक विकासकांनी संताप व्यक्त केला आहे. द्रोणागिरी येथील सेक्टर 29 मधील भुखंड क्र. 47 हा 6 हजार चौरस मीटरचा असून त्या भुखंडाची हद्द ही 20 मीटर नाल्यालगत आहे. एकत्रित विकास व प्रोत्साहनात्मक नियमावली 2023 नुसार नाल्यापासून 6 मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मज्जाव असताना सिडकोच्या नियोजन विभागाने या भुखंडांचे सीमांकन कोणत्या नियमाच्या आधारे केले याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भुखंडाची रुंदी 60 मीटर असून तो 50 मीटरने सीआरझेड बाधित आहे. त्यामुळे विकसकाला फक्त 10 मीटर रुंदीचा भुखंड वापरण्यास मिळणार आहे. ऐरोली येथील भुखंड हा सीआरझेडपासून 30 मीटर अंतरावर असल्याने त्या भुखंडाचे क्षेत्र 20 मीटरने बाधित होणार आहे. सिडको सदर भुखंडांचे पैसे मात्र पुर्ण वसूल करणार असून बाकी नशिबाच्या भरोशावर विकासकांना सोडणार असल्याची प्रतिक्रिया अनेक विकासकांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली आहे. सिडकोचा फसवणुकीचा गोरखधंदा अजूनही सुरु असल्याने यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे