नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 530
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूलच्या अर्श चौधरी याने आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण प्राप्त करुन देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सेंट मेरीज शाळेचा निकाल 100 टक्के लागल्यामुळे शाळेत आनंदोत्सवाचे वातावरण आहे.
मालंकारा ऑर्थोडॉक्स चर्च कौन्सिल ऑफ बॉम्बे (एमओसीसीबी) अंतर्गत संचालित सेंट मेरीज आसीएसई स्कूल, कोपरखैरणे या शाळेने आपली उज्वल शैक्षणिक परंपरा कायम राखली असून दहावी आणि बारावीचा 100 टक्के निकाल हे त्याचे द्योतक असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ब्लेसी मॅथ्यूज व उपमुख्याध्यापक फादर जॉन मॅथ्यू यांनी सांगितले. अर्श चौधरी याने 100 टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. ही अपूर्व आणि दुमळ कामगिरी त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, अभ्यासातील प्राविण्याचा आणि उत्कृष्टतेच्या ध्येयाचा साक्षात्कार असल्याचे त्या म्हणाल्या.
शाळेने मिळवलेल्या या गौरवपूर्ण यशाबद्दल, बॉम्बे धर्मप्रांताचे धर्माध्यक्ष आणि एमओसीसीबीचे अध्यक्ष आर्चबिशप हिस ग्रेस गीवरघीस मार कुरीलोस यांनी अर्श चौधरी याचे अभिनंदन करुन त्याने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai