Breaking News
अवैध धंद रोखण्यासाठी धडक कारवाई
नवी मुंबई : शहरातील बेकायदेशीर कृत्य व अवैध धंदे रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. आठवडाभरात तुर्भे, रबाळे, कामोठे व पनवेल या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाया केल्या. अमली पदार्थ व दारूचे सेवन, हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे तसेच ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री तुर्भे विभागातील तुर्भे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्याचप्रमाणे नाकाबंदीच्या ठिकाणी 125 वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या चार चालकांवर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 35 चालकांवर वाहतूक नियमान्वये कारवाई करण्यात आली. तुर्भे प्रमाणेच रबाळे, कामोठे व पनवेल शहर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतदेखील पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कामोठेमध्ये 113 वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील 22 वाहचालकांवर विविध कारणांमुळे कारवाई करण्यात आली. साव7जनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 10 जणांवर कोफ्टा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या वेळी बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे व इतर गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात आली. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ, तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे व इतर अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
या विशेष मोहिमेत 17 पोलिस अधिकारी व 102 अंमलदार तसेच पोलिस मुख्यालयातील क्युआरटी पथक, आरसीपी पथक, व झोन-1 स्ट्रॉयकिंग पथक सहभागी झाले होते. पोलिसांच्या पथकाने तुर्भे पोलिस ठाणे हद्दीत तुर्भ स्टोअर, तुर्भे नाका, इंदिरानगर, शिरवणे, शिवाजी नगर, श्रमिक नगर, महापेगाव, पावणे गाव आदी भागातील हॉटेल, लॉजेसची तपासणी केली. त्याचप्रमाणे मर्मस्थळे व संवेदनशील ठिकाणी भेटी देण्यात आल्या. जामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai