जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 315
पनवेल : पनवेल : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जे.एम.म्हात्रे यांनी शेकाप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (29 एप्रिल) पनवेलमध्ये बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.
शेकापमधील काही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाच शेकापचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांनी मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रितम म्हात्रे यांनी उरणमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपचे महेश बालदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर रिंगणात होते. महाविकास आघाडीत असूनही मविआच्या दोन उमेदवारांनी उरणमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे शेकापमध्ये प्रचंड नाराजी होती. प्रितम म्हात्रे विजयाच्या थोड्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे हा पराभव त्यांच्या आणि शेकापच्याही जिव्हारी लागला होता.
देशभरात काही निर्णय घेतला तरी आपण सर्व निर्णय पनवेल, उरणमध्ये घेत आलो आहोत. त्यामुळे मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. पक्ष निर्णय घेत नसले तर मी मविआतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. म्हात्रे यांनी जरी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी अद्याप मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पडद्यामागे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत का, याची चर्चा सुरू आहे. ात जाण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. जे.एम.म्हात्रे म्हणजे भाऊंनी याबाबत आपल्यासोबत याविषयी कधीही चर्चा केली नाही, असे त्यांना माध्यमांना सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai