Breaking News
नवी मुंबई ः पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा जुईनगर येथील आबा रणवणे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकतीच यामध्ये आणखी तीन पुरस्कारांची भर पडली आहे. समता सन्मान पुरस्कार, सामाजिक/जनजागृती पुरस्कार आणि राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
पर्यावरण प्रेमी, औषधी वनस्पती तज्ञ असणाऱ्या आबा रणवरे यांना आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नामांकित हस्तीनी सन्मानित केले आहे. आपल्या ज्ञानाचा वापर गरजू रुग्णांवर कसा करता येईल म्हणून मोफत आरोग्य सल्ला देवून समाजसेवा करणाऱ्या रणवरे यांच्या पुरस्कारात आता आणखी तीन पुरस्कारांची भर पडली आहे. नुकतेच त्यांना 1 एप्रिल 2023 रोजी अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांच्या हस्ते त्यांच्या समता सामाजिक संस्था, नेरूळ या संस्थेतर्फे समता सन्मान पुरस्कार प्राप्त झाला. तसेच 8 एप्रिल 2023 रोजी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, अध्यक्ष दिनेश भोईर आणि भाजप आमदार ॲड. अजित गोगटे यांच्या विशेष उपस्थितीत राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच 11 एप्रिल 2023 रोजी मानव सेवा बहुद्देशीय संस्था, एरंडोल, जिल्हा जळगाव येथे दैनिक लोकमत वृत्तपत्रचे पत्रकार एस.बी.चौधरी यांच्या हस्ते सामाजिक/जनजागृती पुरस्कार देऊन आबा रणवरे यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकी खोकरे आणि ॲड. विधीतज्ञ मोहन शुक्ला आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai