Breaking News
नवी मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहरामधील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेचा श्रीगणेशा करून बायोमेट्रिक सर्व्हेचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नितीन पवार, उपजिल्हाधिकारी व सक्षम अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे -1 वैशाली परदेशी-ठाकूर, तहसीलदार स्मिता मोहिते, तहसीलदार किशोर शेटे, सर्व्हेअर दाभाडे, संजय हळदणकर, विजय गुप्ता, प्रसाद कुळस्कर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तसेच उपजिल्हाप्रमुख जगदीश गवते, मा.नगरसेवक रामआशिष यादव, सह संपर्क प्रमुख बहादूर बिष्ट, उपशहर प्रमुख राजू पाटील, मा.नगरसेवक ममीत चौगुले, अमित चौगुले, शुभम चौगुले व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai