Breaking News
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दिली संधी
नवी मुंबई : दक्षिण आफ्रिका येथील डर्बनमध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स गेम्स 2023 साठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान वाशीतील फादर एग्नल स्पोर्ट्स सेंटर मधील जलतरणपटू प्रतिष्ठा डांगी हिला मिळाला आहे. यासाठी प्रतिष्ठाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
डर्बन येथे 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ब्रिक्स गेम्स 2023 सुरू आहेत. या सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने प्रतिष्ठा डांगी या महिला जलतरणपटूला दिली आहे. प्रतिष्ठा ही क्रीडा स्पर्धा सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या 20 जलतरणपटूपैकी एक आहे. 16 वर्षाची असणाऱ्या प्रतिष्ठा हिने ज्युनियर तथा सीनियर नॅशनल आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत अनेक पदक पटकाविले आहेत. मुख्यतः बँक स्ट्रोक या प्रकारात तिचे प्राविण्य असून लवकरच गोवा येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिने सहभाग घेतला आहे. प्रतिष्ठा ही वाशीतील फादर एग्नल स्पोर्ट सेंटर येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक गोकुळ कामत आणि ऋतुजा ऊदेशी यांचे मार्गदर्शन तिला लाभत आहे. प्रतिष्ठावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai