Breaking News
नवी मुंबई ः सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित अर्थात नैना क्षेत्रातील सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने, अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेकरिता संगणकीय सोडत 22 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडणार आहे.
नैना प्रकल्पाच्या मंजूर ऊउझठ नुसार 4000 चौ. मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20% जागा ही आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांसाठी खाजगी विकासकांमार्फत नैना प्रकल्प परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार 19 सप्टेंबर 2023 रोजी एकूण 181 सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात आली होती. यामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी 17 तर अल्प उत्पन्न गटासाठी 164 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सदनिकांकरिता पात्र उमेदवारांची सोडत पद्धतीने निवड करून पात्र उमेदवारांची यादी विकासकाला पाठविणे, एवढ्यापुरतीच सिडकोची भूमिका मर्यादित आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी व अन्य प्रक्रियांकरिता हीींंीि://श्रेीींंशूी.लळवलेळपवळर.लेा हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीच्या अनुषंगाने अर्ज सादर करणे, शुल्क भरणा, प्रारुप यादी प्रसिद्ध करणे व संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai