Breaking News
नवी मुंबई ः श्रीगणशोत्सवाप्रमाणेच उत्साहात संपन्न झालेल्या नवरात्रौत्सवातील विसर्जन सोहळा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेने केलेल्या योग्य नियोजनामध्ये सुव्यवस्थित रितीने पार पडला. महानगरपालिका क्षेत्रात 916 घरगुती / सोसायटी देवीमूर्ती विसर्जनाप्रमाणेच 166 सार्वजनिक देवीमूर्ती विसर्जन असे एकूण 1082 देवीमूर्ती विसर्जन पार पडले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 विसर्जन तलांवांमध्ये जलप्रदूषण टाळण्यासाठी गॅबीयन वॉलची रचना करण्यात आलेली असून त्याच क्षेत्रात भाविकांनी देवीमूर्ती विसर्जन करून जलाशयातील जैवविविधतेचे संरंक्षण करावे या पालिकेच्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला. सर्वच 22 मुख्य विसर्जनस्थळांवर परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यासह विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच 200 हून अधिक स्वयंसेवक, लाईफगार्ड आणि अग्निशमन दलाचे जवान विसर्जन सोहळा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दक्ष होते. देवींच्या सुयोग्य विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 130 घरगुती / सोसायटी व 21 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 88 घरगुती / सोसायटी व 27 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 77 घरगुती / सोसायटी व 10 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 114 घरगुती / सोसायटी व 30 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 67 घरगुती / सोसायटी व 33 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 289 घरगुती / सोसायटी व 9 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 51 घरगुती / सोसायटी व 29 सार्वजनिक आणि दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 100 घरगुती / सोसायटी व 7 सार्वजनिक अशा एकूण 916 घरगुती / सोसायटी व 166 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 1082 देवीमूर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
सर्व 22 मुख्य विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणाही सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. भाविकांच्या उत्तम सहकार्यामुळे देवीमूर्ती विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यस्थितीत संपन्न झाला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai