Breaking News
183 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
नवी मुंबई ः दिवाळीपूर्वीपासून खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांना व प्रतिबंधित प्लास्टिकला अटकाव करण्याच्या दृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. यामध्ये 183 किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला तसेच 1 लक्ष 65 हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला.
बेलापूर विभागात 12 व्यावसायिकांवर कारवाई करीत 50 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करुन 60 हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. नेरुळ विभागात एका व्यावसायिकाकडून 1 किलो प्लास्टिक जप्त व 5 हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. वाशी विभागात 9 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व 40 हजार दंड वसूली 7 व्यावसायिकांकडून करण्यात आली. तुर्भे विभागात 2 व्यावसायिकांवर कारवाई करीत 10 हजार दंडवसूली व 5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. कोपरखैरणे विभागात 15 हजार दंडात्मक रक्कम वसूलीसोबतच 3 व्यावसायिकांकडून 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात अर्धा किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या जप्ती व 5 हजार दंडात्माक रक्कम वसूली करण्यात आली. त्याचप्रमाणे परिमंडळ 1 च्या भरारी पथकाने 4 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती केली व 10 हजार दंडात्मक रक्कम 2 व्यावसायिकांकडून वसूल केली. तसेच परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 109 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले व 20 हजार दंडात्मक रक्कम 4 व्यावसायिकांकडून वसूल केली. अशाप्रकारे एकूण 32 व्यावसायिकांवर कारवाई करीत 183 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व 1 लाख 65 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ श्रीराम पवार यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकांनी ही कारवाई केली. ऑक्टोबर महिन्यातही 264 किलो 460 ग्रॅम प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात येऊन 2 लक्ष 90 हजार रक्कमेची दंड वसूली 58 व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai