
मराठा व्यवसाय संघाचा वार्षिक मेळावा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 09, 2023
- 415
व्यवसायिकांचा उस्फुर्त प्रतिसाद : मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई : मराठा व्यवसाय संघाचा वार्षिक मेळावा रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी कोपरखैरणे येथील सहकार भवन मध्ये पार पडला. या मेळाव्याला मराठा व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मराठा समाजातील युवकांनी इतर समाजातील बांधावांप्रमाणे व्यवसाय क्षेत्रात प्रगती साधावी व समाजातील व्यावसायिकांची एकमेकांना ओळख व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे मराठा व्यवसाय संघाच्या वतीने यावर्षी देखील ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई येथील मराठा व्यावसायिकांचा वार्षिक मेळावा रविवारी कोपरखैरणे येथील सहकार भवन येथे आयोजित केला होता. या मेळाव्याला सुमारे 250 लहान, मोठे व्यवसायिक उपस्थित होते. दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार, शिव गारद, राष्ट्रगीत, राज्यगीत झाल्यानंतर मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी 5 यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यात उपस्थित मराठा बांधवांनी आपल्या व्यवसाय परिचय दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा व्यवसाय संघाच्या दिनदर्शिका 2024 चे देखील अनावरण करण्यात आले.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगरपालिकेचे उपायुक्त सुभाष जाधव उपस्थित होते. यावेळी व्यवसाय संघाचे मुंबई विभाग प्रमुख कैलास फाळके तसेच पदाधिकारी मोहना हांडे, अरुण कदम, प्रदीप यादव, विकास मुळीक, दीपक पोखरकर, रवी कदम, विशाल पवार, सुहास कापसे, सुरेश पवार, सुनील माने व इतर संघटकानी मेळावा यशस्वी होण्याकरिता विशेष मेहनत घेतली. या मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे, सांगली, नांदेड रत्नागिरी येथील मराठा व्यवसायिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai