
आदिती तांबे ठरली मिस नवी मुंबई
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2025
- 174
भावना सिंग पहिली रनर-अप आणि काव्या बाली दुसरी रनर-अप
नवी मुंबई ः बहुप्रतिक्षित मिस नवी मुंबई 2025 चा भव्य ग्रँड फिनाले हॉटेल फोर पॉईंट्स बाय शेराटन, वाशी येथे दिमाखात पार पडला. यू अँड आय एंटरटेनमेंट द्वारे आयोजित या प्रतिष्ठित सोहळ्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सशक्तीकरण या संकल्पनेला उजाळा देत देशभरातून आलेल्या प्रतिभावान महिलांच्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचा उत्सव साजरा केला. अनेक कठोर फेऱ्यांनंतर आदिती तांबे हिला विजेतेपदाचा ताज मिळाला, तर भावना सिंग पहिली रनर-अप आणि काव्या बाली दुसरी रनर-अप ठरल्या.
यू अँड आय एंटरटेनमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर हरमीत सिंग यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मिस नवी मुंबई सीझन 14 ने स्पर्धकांना त्यांच्या सौंदर्याबरोबरच आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक ओळख सादर करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी स्पर्धकांनी विविध नामांकित डिझायनर्सच्या पोशाखांमध्ये आपले सौंदर्य सादर केले. पारंपरिक पोशाखांसाठी ‘राजकुमारी बाय ऋचा हावरे’, वेस्टर्न वेअरसाठी ‘जेडी इन्स्टिट्यूट, वाशी’ आणि इव्हनिंग गाऊन राउंडसाठी ‘ खारघर’ यांनी खास डिझाईन्स तयार केल्या होत्या. या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत मान्यवर परीक्षकांचा सहभाग होता. एस के बिल्डर्सच्या डायरेक्टर वंदना कुमार, शिकारा ग्रुपचे संस्थापक अशोक मेहरा, अभिनेत्री व मॉडेल रिया मेक्काटुकुलम (मिस क्वीन ऑफ इंडिया 2021 आणि मिस नवी मुंबई 2020), मिस मल्टीनेशनल इंडिया दिविजा गंभीर, फ्रेंच एसेंस परफ्युमच्या डायरेक्टर निधी गुप्ता आणि रोनक ॲडव्हर्टायझिंगचे डायरेक्टर रोनक सिंग विग यांनी परीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अनेक कठोर फेऱ्यांनंतर आदिती तांबे हिला विजेतेपदाचा ताज मिळाला, तर भावना सिंग पहिली रनर-अप आणि काव्या बाली दुसरी रनर-अप ठरल्या. याशिवाय, भावना सिंग हिला मिस बेस्ट स्माईल आणि मिस कॉन्जेनियलिटी किताब मिळाला, तर करिश्मा कदम हिने मिस फोटोजेनिक आणि मिस बॉडी ब्यूटीफुल हे खिताब पटकावले. आदिती तांबे हिला मिस रॅम्प वॉक, मिस टॅलेंट आणि मिस इंटरनेट पॉप्युलर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विनीत कौर हिला मिस फ्रेश फेस, काव्या बाली हिला मिस ग्लोइंग स्किन, अवनी आचार्य हिला मिस ब्यूटीफुल आयज, रूपवर्धिनी सस्ते हिला मिस स्टाईल आयकॉन आणि साक्षी चुरी हिला गर्ल ऑफ द शो या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या भव्य सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करताना हरमीत सिंग म्हणाले, “मिस नवी मुंबई ही केवळ सौंदर्यस्पर्धा नसून, ती तरुण महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे एक व्यासपीठ आहे. या मंचाद्वारे अनेकांना त्यांच्या करिअरमध्ये संधी मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. या प्रतिभावान स्पर्धकांना आत्मविश्वासाने चमकतांना पाहणे आमच्यासाठी आनंददायी आहे. सर्व विजेत्या आणि अंतिम फेरीतील स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन ही तर त्यांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे!
स्पर्धेच्या तयारीसाठी सिमृती भाटिया आणि इंदरप्रीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांना रॅम्प वॉक, व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स आणि मेंटल वेलनेस यामध्ये सखोल प्रशिक्षण देण्यात आले. ही भव्य संध्याकाळ निशा शेट्टी यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने अधिक रंगतदार झाली, तर सन्यास द बँड चे मनमीत सिंग गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील जबरदस्त परफॉर्मन्सने वातावरण अधिक रोमांचक बनवले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai