
सिडकोमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2025
- 91
सिडकोमध्ये शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे शिवजयंती सोहळ्याचे दि.17 एप्रिल 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करून व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची नेहमीच आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. यासारखेच महाराजांचे अनेक गुण आहेत, ज्याबदद्ल केवळ चर्चा केली जाते. परंतु महाराजांच्या अंगभूत गुणांपैकी एका गुणाचा तरी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अवलंब करावा असे आपले मनोगत सुरेश मेंगडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस सादर करण्यात आलेल्या ङ्गमुजरा माझा महाराष्ट्रालाङ्घ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संगीतमय नाट्यकृतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे सहचिटणीस सुधीर कोळी यांनी केले.
या प्रसंगी सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नरेंद्र हिरे, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, श्री. संजय पाटील उपाध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, श्री. नितिन कांबळे, सरचिटणीस, सिडको एम्प्लॉईज युनियन व सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai