नापकला दाखवली औकात
- by Aajchi Navi Mumbai
- May 09, 2025
- 310
पाकच्या कुरापतींना सडेतोड उत्तर ; सिंदुर भडकले हल्ले परतवले
पहलगाम मध्ये केलेल्या दहशतवादी हल्याला उत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. या हल्ल्याने पाक चांगलाच भेदरला आहे मात्र त्याने आपल्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच सीमेपलीकडून गोळीबार झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवार रात्रीपासून जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करुन हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूला नेस्तनाबूत केले. भारतीय सैन्यदलाने वायूदल, हवाईदल आणि पायदळ या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे सीमेवर युद्धाची गडद सावली असल्याची चित्र निर्माण झाले आहे.
- नौदल सतर्क
पाकिस्तानने अरबी समुद्रातील गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा मुंबईवर झालेल्या 2611 हल्ल्याप्रमाणे समुद्री मार्गाने लपून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल सतर्क झाले आहे. भारतीय नौदलाने भारतीय मच्छिमारांना मासेमारीसाठी विशिष्ट मर्यादा घालून देण्यात आली आहे. समुद्रात या मर्यादेपलीकडे आत जाऊ नये, अशी सूचना मच्छिमारांना देण्यात आली आहे. नौदलाने आखून दिलेल्या सीमेबाहेर शूट टू किलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका ॲपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांनी कोणते निर्देश दिले?
- भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या भारतातील सर्व राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
- - प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
- - ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
- - ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्याथ, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
- - केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
- - प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
- - प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
- - एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
- - पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
- - सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
- - सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
- - नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
- - शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या
- सेनाध्यक्षांकडे सर्वाधिकार
संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाला महत्त्वाचे अधिकार दिले असून पुढील 3 वर्षांपर्यंत हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तिनही सैन्य दलाच्या प्रमुखांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. टेरिटोरियल आम नियम 1948 च्या नियम 33 नुसार भूदल प्रमुखांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, टेरिटोरियल आमच्या सर्वच अधिकारी आणि सैनिकांना आवश्यक सुरक्षा ड्यूटी नियमित सेना के समर्थन में सक्रिय सेवेत (एंबॉडीमेंट) बोलवू शकतात. सध्या 32 टेरिटोरियल आम इन्फँट्री बटालियनमधील 14 बटालियन देशाच्या विविध सैन्य दलांना, साउदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कमांड, नॉर्दर्न कमांड, साउथ-वेस्टर्न कमांड, अंदमान व निकोबार कमांड आणि आम ट्रेनिंग कमांड येथे तैनात करण्यात येईल. सैन्य सेवेसंदर्भात 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत सेनाध्यक्षांकडे हे सर्वाधिकार असणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये-
1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
5. 9 तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले
- मंदिरातफुले, नारळ बंदी
भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आता शिडच्या साईबाबा देवस्थानही ‘अलर्ट मोड’वर आल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरात वाहिली जाणारी फुलं, हार आणि अन्य पूजासामग्रीची स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. कोणताही संशयास्पद पदार्थ मंदिर परिसरात शिरू नये, यासाठी विशेष मशीनद्वारे या वस्तूंची तपासणी केली जात आहे. मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिकल उपकरणांवर सक्तीची बंदी घातली आहे.
- मुंबईतील यंत्रणा ॲलर्ट मोडवर
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यंत्रणा ॲलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. संवेदनशील भागात पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदी सर्व यंत्रणांची प्रात्यक्षिके तसेच पूर्वतयारी करून घेण्यात आलीय. सुरक्षेच्या द़ष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तारापूर, बीएआरसी, महत्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
- आयपीएलचे सामने स्थगित
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उरलेले सामने एका आठवड्यासाठी स्थगित कऱण्यात आले आहेत. तर एका आठवड्यानंतर उर्वरित सामन्यांसंदर्भात आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai