प्रितम म्हात्रे यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी

पनवेल : महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी गणेशोत्सव निमित्ताने वडाळे तलावाच्या विसर्जन घाटांची पाहणी केली. यावेळी पालिका अधिकार्‍यांना कोविडच्या अनुषंगाने त्यांनी सूचना केल्या.पालिकेच्या 64 ठिकाणी गणपती विसर्जन घाट आहेत. भाविकांनी मास्क, सोशल डिस्टन्स याचे पालन करावे. जास्त गर्दी करता कामा नये. हे सगळे नियम 64 ठिकाणी हेच नियम लागू पडतात असे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे. 

गणपती विसर्जन निमित्त दरवर्षी घाई घाईत कामे उरकली जातात. मात्र यावर्षी व्यवस्थितीरित्या गणेश विसर्जन सर्व ठिकाणी व्हायला हवे असे प्रितम म्हात्रे यांनी या पाहणी दरम्यान सांगितले. तलावाची सध्याची परिस्थिती पाहता दोन ते तीन ठिकाणाहून प्रवेश आहे. यावेळी विसर्जनासाठी एकाच ठिकाणाहून प्रवेश ठेवण्यात येणार आहे. बाकीचे प्रवेश बंद करण्यास सांगितल्या आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम राहणार नाही. विसर्जनाच्या वेळेस महापालिकेच्या अधिकार्‍यांची आरटीपीआर टेस्ट करून अँटीजेन टेस्ट करून ठेवायला हवे. विसर्जनासोबत भाविकांनी एका गणपती सोबत चार जण ठेवायला हवेत. जर जास्त नागरिक आलेच तर यासाठी पालिकेला आरोग्य सुविधा तैनात ठेवण्यास सांगितल्या आहेत. याठिकाणी दोन बॅनर लावा जेणेकरून विसर्जनाच्या वेळेस किती जण आले आहेत याची माहिती मिळेल. 

कोळी वाड्यावर मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते. याठिकाणी जर कुठे काही कमी पडत असले तर यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवक पुढे येतील असे सांगण्यात आले. गणपतीच्या सणामध्ये नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे. म्हात्रे यांनी विसर्जन घाटाची पाहणी करून तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकार्‍यांना महत्वाच्या सूचना करून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले. त्यामध्ये 64 विसर्जन घाटातील विसर्जन करणार्‍या व तैनात करणार्‍या स्वयंसेवक, स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य सेवक यांची दोन ते तीन दिवस अगोदर आरटीपीआर टेस्ट करावी आणि विसर्जनाच्या दिवशी अँटीजेन टेस्ट करून घ्यावी तेव्हाच त्यांची नेमणूक तिथे करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील गणेश भक्तांची नोंद करून आरोग्य तपासणी करावी. वेळ पडल्यास तिथे अँटीजेन टेस्ट करावी, आरोग्य टीम प्रत्येक विसर्जन स्थळी पूर्णवेळ तैनात करावे, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, यांची देखील व्यवस्था करावी अशा महत्वाच्या सूचना विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केल्या आहेत.