खारघरमध्ये 12 हजार जणांवर वाहतुक विभागाची कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 192
पनवेल : जानेवारी महिन्यापासून 25 एप्रिलपर्यंत या 115 दिवसांत खारघर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनाहेल्मेट प्रवास करणारे तीन हजार 283 दुचाकीस्वार आणि 32 मद्यपींवर पोलिसांनी कारवाई केली. 115 दिवसांत वाहतूक पोलिसांनी तब्बल 12 हजार 212 जणांवर वाहतूक नियम तोडल्याने कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 47 हजार 500 रुपयांचा महसूल गोळा केल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.
स्मार्ट शहर म्हणून खारघरची ओळख होत असली येथील रहिवाशांच्या अंगी वाहन चालविण्याचे नियम पाळण्याची साक्षरता कमी असल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसत आहे. 71 जणांना मागील 115 दिवसांत विरुद्ध दिशेने वाहन चालविताना पोलिसांनी पकडले आहे. सिग्नल तोडणाऱ्या 235 जणांवर 115 दिवसांत पोलिसांनी कारवाई केली. मोटार चालविताना सीटबेल्ट लावणे गरजेचे असताना 251 जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली. तसेच वाहन चालविताना 200 चालकांना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडले. वाहन चालवताना अवैधपणे मार्गिका ओलांडणाऱ्या वाहन चालविणारे म्हणजे लेन कटींग करणारे 62 जणांना पोलिसांनी पकडले. अल्पवयीन मुले वाहन चालविताना मागील वष आठ जणांना पकडले होते. तर या वष चार महिन्यांत आतापर्यंत एकावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी 12 हजार वाहनचालकांवर कारवाई केली असली तरी यामधील 25 टक्के वाहनचालकांना दंडाची कारवाई झाल्याची माहिती प्रत्यक्षात मिळाली. कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी वाहन मालकांना मिळणारी ऑनलाइन दंडाची पावती मिळत असल्याने यातील शेकडो वाहन मालकांना कारवाईची कल्पना नसेल. कारवाईनंतर थेट बँक खात्याचा लघुसंदेश जेवढ्या तत्परतेने येतो तसा जलदगतीने लघुसंदेश येणे महत्त्वाचे आहे.
अल्पवयीन मुलांकडे वाहने चालविण्याचा परवाना नसताना सुद्धा पालक त्यांच्या हाती दुचाकी देतात असे आमच्या कारवाईत आम्हाल आढळते. आम्ही संबंधित मुलांच्या पालकांना येथे येऊन कारवाईस सामोरे जाण्याचे आवाहन करतो. अपघाती मृत्यूचे प्रमाण कसे खारघरमध्ये कमी होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. पनवेल महापालिका लवकरच खारघरच्या 66 ठिकाणी नवीन सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणे अधिक सोपे जाईल. संतोष काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक विभाग
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai