
व्यसनांकडे तरुणांनी पाठ फिरवावी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 16, 2022
- 580
नवी मुंबई ः शरीराची, कुटुंबाची वाताहत करणार्या व्यसनांकडे तरुणांनी पाठ फिरवावी कारण ते एकदा जडले की आपले व कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करते असे आवाहन डी वाय पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शिरीष पाटील यांनी केले. वाशीत अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या दशकपुर्ती सोहळ्यावेळी ते बोलत होते.
व्यसनमुक्तीसाठी काम करायचे हे ठरवून प्राध्यापक अजित मगदूम यांनी 2012 मध्ये अन्वय व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना केली. संस्थेने गेल्या दहा वर्षांच्या काळात सुमारे 4500 व्यसनींना समुपदेशनकरुन व्यसनमुक्त केले आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचा दशकपुर्तीं सोहळा 12 जुलै रोजी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शिरीष पाटील, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व लेखक सुरेश हावरे, ज्ञानविकास संस्थेचे ुज्ञमुख अॅड. पी.सी. पाटील, रोटरी क्लब चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुरेश बाबू गॅलेक्सी सरफॅक्टंट लिमिटेड चे उपाध्यक्ष आदर्श नायर उपस्थित होते.
काही चित्रपट क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती व्यसनजन्य पदार्थांच्या बिनधास्त जाहिराती करतात त्यांच्यावर बहिष्कार टाकावा असे आवाहन डॉ सुरेश हावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री मुक्ती संघटनेच्या महिलांनी दारु वरील गीत सादर केले. अन्वय चे संचालक डॉक्टर अजित मगदूम यांनी सद्यकालीन व्यसनाची स्थिती विशद केली. गेल्या दहा वर्षात अन्वयला साथ देणारे, मदत करणारे, पाठिंबा व पाठबळ देणारे यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयसीएल कॉलेज तर्फे व्यसनमुक्तीचा एकच प्याला हे पथनाट्य सादर करण्यात आले अखेरीस घोषवाक्य स्पर्धेमध्ये भाग घेणार्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. अन्वयेचे सर्व कार्यकर्ते, नवी मुंबईतील अनेक मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai