छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश
- by Aajchi Navi Mumbai
- May 20, 2025
- 219
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
भुजबळ यांचा परिचय
- जन्म :- 15 ऑक्टोबर 1947.
- जन्म ठिकाण :- नाशिक.
- शिक्षण :- एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).
- व्यवसाय :- शेती.
- पक्ष :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
- मतदारसंघ :- 119 - येवला, जिल्हा-नाशिक.
इतर माहिती :- संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई, माजी विश्वस्त, व्हि. जे. टी. आय. संस्था, मुंबई, विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा स्थान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवगयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, 5 नोव्हेंबर 2010 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटी दरम्यान महात्मा फुले यांनी लिहिलेल्या “गुलामगिरी“ या पुस्तकाचा “स्लेव्हरी“ हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला; माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट, 1985 “दैवत“ व 1990“नवरा बायको“ या मराठी चित्रपटांची निर्मिती; 1973 सदस्य, 1973-84 विरोधी पक्षनेते, 1985 व 1991 महापौर, मुंबई महानगरपालिका; याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; 1991 अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, 1991 पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; 1991 नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून 1999 ते नोव्हेंबर 1999 महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; 1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा 1996-2002 व 2002-2004 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषदः डिसेंबर 1991 ते मार्च 1993 महसूल खात्याचे मंत्री; मार्च 1993 ते मार्च 1995 गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; 1996-1999 विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषदः ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, नोव्हेंबर 1999 ते जानेवारी 2003 मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी 2003 ते डिसेंबर 2003 उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर 2004 ते ऑक्टोबर 2009 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री; या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तु उभी केली, ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडः जानेवारी 2020 मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री, नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai