Breaking News
पनवेल : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात गत शुक्रवारी प्रियांका रावत या प्रवासी महिलेचा खून झाला होता. या प्रकरणी पोलीसांनी पती व त्याच्या प्रियसीसह अजून चार जणांना अटक केली आहे. प्रियांकाला मारण्यासाठी कंत्राटी मारेकर्यांना पाच लाख रुपयांची सुपारी देऊ केल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्रियांका हीचा 31 वर्षीय पती देवव्रत रावत हा अमेझॉन कंपनीत कामाला होता. याचदरम्यान 23 वर्षीय निकिता मतकर यांची ओळख झाली. त्यांचे काही महिन्यात प्रेम झाले. नूकतेच देवव्रत आणि निकीता यांनी एका मंदीरात विवाह केला होता. प्रियांका हीला या विवाहबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या संसारात भांडणे सूरु झाली. देवव्रत आणि निकिता यांनी रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर प्रियंका हीला संपविण्याचा निर्णय घेतला. निकिता ही खासगी शिकवणी वर्ग घेत होती. या शिकवणीवर्गाचा मालक प्रविण घाडगे हा होता. प्रविण, प्रियांका आणि देवव्रत यांनी तीघांनी एकत्रितपणे पैशांची जुळवाजुळव करुन मारेकरी फेसबुकवर बुलढाणा जिल्ह्यातील शोधले. वाहन चालक असणारा रोहीत उर्फ रावत उर्फ शिव राजू सोनोने, बाजारात माल विक्री करणारा पंकज नरेंद्रकुमार यादव तर दूध विक्री करणारा दीपक दिनकर लोखंडे या 22 ते 26 वर्षे वयोगटातील संशयी आरोपींना खूनाची सुपारी दिली. या प्रकरणी पती व त्याच्या प्रियसीने फेसबूकवरुन ओळख काढून कंत्राटी मारेकर्यांना पाच लाख रुपयांची सुपारी देऊ केली होती. सूपारीचे पाच लाख रुपयांपैकी सव्वा लाख रुपये बँकेच्या आरटीजीएसने मारेकर्यांना दिल्याचा पुरावा पोलीसांच्या हाती लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. या तीघांवर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे बुलढाण्याच्या मलकापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूभाष कोकाटे, पोलीस निरिक्षक वैशाली गलांडे, पोलीस अधिकारी समीर चासकर, शरद बरकडे, शांतीभुषण कामत, किरण वाघ, पोलीस कर्मचारी महेश कांबळे, सुदर्शन सारंग, प्रकाश पाटील, वैभव शिंदे,धिरेन पाटील व इतर कर्मचार्यांनी अथक मेहनत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद ेत दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai