Breaking News
पनवेल ः राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत अवैध मद्याचा साठा 76 लाख 77 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पनवेल जवळील मौजे कोपरा गावाच्या हद्दीतून जाणार्या सायन-पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक एक वर एक ट्र्क अडवून हा माल पकडण्यात आला.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वर्भूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारूची आवक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय पुरळकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, शिवाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव, जवान विलास चव्हाण, महिला जवान रमा कांबळे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. तेथे असलेल्या पथकर वसुली नाक्याच्या पुढील बाजूस संशयित ट्रक अडवून त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध गोवा मद्याचे 898 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी ट्रकचालक संदीप पंडित व समाधान धर्माधिकारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai