
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 11, 2023
- 461
मुंबई ः 23 वर्षानंतर राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यांत स्टेट पार्टी म्हणून असणार आहे. 2014, 2019 च्या दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात जिथे राष्ट्रवादी लढली तिथल्या कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, माकप या दोन पक्षांसह राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष ठरलाय, ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे.
राष्ट्रवादीची स्थापना 1999 सालची. अवघ्या एका वर्षातच म्हणजे 2000 मध्येच राष्ट्रवादीला हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला होता. पण आता 23 वर्षानंतर तो हिरावला गेला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आयोगानं ठाकरेंकडून शिंदेच्या शिवसेनेला दिलं. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानं पवारांचं घड्याळही महाराष्ट्र, नागालँडबाहेर चालणार नाही. एकीकडे तृणमूल, राष्ट्रवादी, भाकप या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावला गेलाय. तर दुसरीकडे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मात्र तो मिळाला आहे. लोकसभेत आपचा एकही खासदार नाहीत पण दिल्ली, पंजाब, गोवा गुजरात या राज्यांत आपनं राज्य पक्षाचा दर्जा मिळवला आहे. यातल्या दिल्ली, पंजाबमध्ये तर त्यांचे मुख्यमंत्री आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ज्या पक्षांचा दर्जा रद्द करण्यात आला आहे, त्या पक्षांना देशभरात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. या पक्षांन 2 लोकसभा निवडणुका आणि 21 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. या निवडणुकांमधील कामगिरीच्या आधारावर या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. मात्र, पुढील निवडणुकीत या पक्षांना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला म्हणजे काय काय गेलं?
- राष्ट्रवादीला त्यांचं घड्याळ हे चिन्ह आता केवळ महाराष्ट्र, नागालँड या दोन राज्यांत कायम ठेवता येईल
- इतर राज्यांत कुणी हे चिन्ह मागितलं तर निवडणूक आयोग ते तात्पुरतं देऊ शकतं
- राष्ट्रीय पक्षाला राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते ती राष्ट्रवादीला आता मिळणार नाही
- निवडणुकीत सरकारी वाहिन्यांवर प्रचारासाठी राखीव असलेला वेळ आता राष्ट्रवादीला मिळणार नाही
राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठी हे तीन पर्याय?
- लोकसभा निवडणुकीत किमान 2 टक्के म्हणजे 11 जागा जिंकाव्या लागतील आणि किमान 3 राज्यांमध्ये उमेदवारही उभे करावे लागेल.
- लोकसभा निवडणुकीत किमान 4 खासदार असतील आणि सोबत देशाच्या 4 राज्यांमध्ये विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळवून दाखवावी लागतील.
- तिसरा पर्याय म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या आकड्यात न पडता, देशाच्या किमान 4 राज्यांमध्ये स्टेट पार्टी हा दर्जा टिकवावा लागेल. सध्या महाराष्ट्र, नागालँड या दोन राज्यांत राष्ट्रवादीला हा दर्जा आहे. त्यांना अजून दोन राज्यांत त्यासाठी कामगिरी सुधारावी लागेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai