
घरांच्या किमंती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 18, 2023
- 209
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लाभार्थ्यांना आश्वासन
नवी मुंबई ः शेकडो सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या समस्या व मागण्या ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. हे सर्व ऐकून घेतल्यावर या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय धसास लावतो असे आश्वासन त्यांनी लाभार्थ्यांना दिले.
पंतप्रधान आवास योजनेतील 7849 घरांची लॉटरी काढताना सिडकोने अत्यल्प उत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे 35 लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने हे दर कमी करावेत, म्हणून सिडको सोडतधारक महिना भरापासून लढा देत आहेत. या प्रश्नांसंदर्भात 6 एप्रिल रोजी सिडको सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेतली. 8 एप्रिल ला ट्विटर वर या हॅशटॅग ची मोहीम चालवली. या मोहिमेअंतर्गत 5000 पेक्षा जास्त ट्विट करून सोडतधारकांनी आपला निषेध सिडकोला नोंदवला. तरीही सिडकोने या प्रश्नाची दखल घेतली नाही. त्यामुळे मनसेने 12 एप्रिलला सिडको विरोधात “भीक मागा” आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरे हे नवी मुंबईत आले असता लाभार्थ्यांनी त्यांची भेट घेवून आपले प्रश्न मांडले व घरांच्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक चर्चा करुन या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय मार्गी लावून लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai