
कामोठेत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 10, 2023
- 226
नवी मुंबई : कामोठे वसाहतीत आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाला. तरुणांनी गौतमीला बघण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबईतल्या कामोठे भागात हा कार्यक्रम होता. तिला पाहण्यासाठी तरुणांची खूपच गर्दी झाली. गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की त्यात राडा होणारच हे जणू ठरलेलचं आहे. गौतमी पाटीलने अनेकदा हे सांगितलं आहे की माझ्या कार्यक्रमात राडा करायचा असेल तर येऊच नका. मात्र कार्यक्रमात गोंधळ होत असल्याने गौतमीला गणपती उत्सवात कोल्हापूरमधल्या दोन ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. नवी मुंबईत गौतमी पाटीलचा पहिलाच कार्यक्रम होता. गौतमी पाटील या कार्यक्रमात तिचं नृत्य सादर करत होती. दरम्यान खुर्च्यांची मोडतोडही सुरु झाली. उडालेल्या गोंधळानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवला तसंच कारवाई करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेरही काढलं. मात्र तोपर्यंत काही उत्साही तरुणांनी खुर्च्यांची तोडफोडही केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai