Breaking News
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री पवार यांची घोषणा
मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. यावेळी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनसाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे 21 वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र भवन उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी मुंबई शहरात इतर 18 राज्यांची भवन उभारण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्र भवन अजूनही प्रलंबित असल्याने महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून मुंबईत कामासाठी येणार्या नागरिकांची गैरसोय होते. वाशी रेल्वे स्थानकासमोरील सेक्टर 30 परिसरात सिडको प्रदर्शन केंद्राजवळ आठ हजार चौरस मीटरचा भुखंड या भवनासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. राज्याच्या अर्थ विभागाने या बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा अशी सिडकोची अपेक्षा आहे. त्यामुळे गेली 21 वर्ष तिथे एकही विट रचली गेली नाही. या भवनसाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला आहे. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसते. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणार्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. याकरिता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आ. मंदा म्हात्रे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नवी मुंबईतील प्रस्तावित महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांना मनपुर्वक धन्यवाद देते. नवी मुंबईतही इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सदन डौलाने उभे राहिल. - आ. मंदा म्हात्रे
इतर महत्त्वाच्या घोषणा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai