Breaking News
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला. येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच मास्क वापरणं आता ऐच्छिक असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनंतर राज्यात यंदा गुढी पाडवा सण मोठ्या उत्साहात आणि शोभायात्रा काढून साजरा करता येणार नाही. तसंच रमझान आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहात साजरी करता येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण उत्सावासह अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसंच सणांच्या तोंडावर निर्बंध हटवण्यात यावेत अशी मागणीही होत होती. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंझ नसल्याचं जाहीर केलं आहे.
2 तारखेला गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai