Breaking News
मुंबई ः तेल-तेलबिया बाजारात सोयाबीन तेलाच्या किमती सुधारल्या कारण शिकागो एक्सचेंज सुमारे अर्धा टक्का मजबूतीसह बंद झाला तर आयात किंमतीच्या तुलनेत सोयाबीनच्या स्थानिक किमती कमी झाल्यामुळे सोयाबीन तेलबियांचे भाव पूर्वस्तरावर राहिले आहेत. त्याच वेळी, पामोलिन तेलाच्या घसरणीमुळे जवळपास सर्व खाद्यतेल-तेलबियांचे भाव मागील स्तरावर बंद झाले. सध्या खाद्यतेलाच्या किमती खूपच कमी आहेत; परंतु किरकोळ किमतीत लक्षणीय घट झालेली नाही, त्यामुळे किमती आणखी कमी होण्यास पूर्ण वाव आहे.
सोयाबीन डेगम तेलाची आयात अत्यंत महाग असून या तेलाच्या स्थानिक किमती कमी असल्याने आयातीत तोटा होत असल्याचं बाजारातले जाणकार सांगतात. पामोलिन तेलाची किंमत एवढी कमी आहे की, त्यापलीकडे कोणतंही खाद्यतेल टिकणार नाही. पामोलिनचे दर असेच स्वस्त राहिल्यास सुमारे दीड महिन्यानंतर येणार्या सोयाबीन, भुईमूग आणि कापूस बियाणे पिकांच्या भावाबाबत अडचण निर्माण होऊ शकते. असं झाल्यास देशांतर्गत शेतकर्यांच्या हितासाठी सरकारला योग्य ती पावलं उचलावी लागतील, असं सूत्रांनी सांगितलं. दर घसरल्याचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किमती विदेशात कोलमडल्या असून सरकारने आयात शुल्कातही शिथिलता आणली आहे. असं असूनही, किमतीतल्या घसरणीमुळे ग्राहकांना त्याचा 25-30 टक्केही लाभ मिळत नाही. याचं कारण म्हणजे किरकोळ व्यवसायात किरकोळ किंमत आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवली जाते.
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये किरकोळ विक्रेत्यांना मोहरीचं तेल 140 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात होतं तर 180-200 रुपये प्रति लीटर एमआरपी दराने मोहरीचं तेल विकलं जात होतं. सरकार अशा सौद्यांवर लक्ष ठेवू शकतं आणि ग्राहकांकडून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त शुल्क का आकारलं जात आहे हे तपासू शकतं. हे तेल 145 रुपयांपेक्षा जास्त दराने विकलं जाऊ नये, असं सूत्रांचं म्हणणं आहे. घाऊक विक्रेत्यांचं मार्जिन खूपच कमी आहे; परंतु किरकोळ विक्रीत एमआरपीच्या बहाण्याने जास्त किंमत आकारली जात आहे. परदेशात तुटलेल्या किमतीमुळे भारतातही तेलाचे दर खाली यायला हवेत, असं सूत्रांनी सांगितलं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai