Breaking News
मुंबई : अतिवृष्टीमुळे झालेलं प्रचंड नुकसान आणि फळभाज्यांच्या उत्पादनातल्या संभाव्य घटीमुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बटाट्यासह टोमॅटो आणि अन्य भाज्यांनी भाव खाल्ला असून त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आला आहे.
बटाटे, टोमॅटो आणि कांदा हा स्वयंपाक घरातला रोजचा अत्यावश्यक घटक आहे. सध्या भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. टोमॅटो, बटाटे आणि कांद्याच्या भाववाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यातच टोमॅटोचं उत्पादन चार टक्के आणि बटाट्याचं उत्पादन पाच टक्के घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला. यंदा टोमॅटोचं उत्पादन दोन कोटी तीन लाख टन राहण्याची शक्यता आहे तर गेल्या वर्षी टोमॅटोचं एकूण उत्पादन दोन कोटी 11 लाख होतं. कृषी मंत्रालयाने फलोत्पादनाविषयीचे आकडे आणि अंदाज वर्तवल्यानंतर ही बाब समोर आली आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीपासूनच टोमॅटोचे दर वाढायला सुरुवात झाली होती. सध्या टोमॅटोचे भाव 80 रुपये किलो झाले आहेत. दिवाळीपर्यंत पावसाचं सावट होतं. त्यामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालं. परिनामी टोमॅटोचं उत्पादन घटलं तर दुसरीकडे सणांमुळे आणि उत्पादन घटल्याचा फटका ग्राहकांना बसला. टोमॅटोचे भाव वेगात वाढले. एक किलो टोमॅटोसाठी आता 80 रुपये मोजावे लागत आहेत तर येत्या काही दिवसांमध्ये दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्रालयाच्या आकड्यानुसार, बटाट्याचं उत्पादनही घटणार आहे. 2021-22 दरम्यान बटाट्याच्या उत्पादनात पाच टक्क्यांची घसरण झाली होती. यंदा बटाट्याचे उत्पादन पाच कोटी 33 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी बटाट्याचं उत्पादन पाच कोटी 61 लाख टन झालं होतं. यंदा कांद्याचे दर अचानक वाढले आहेत; पण काद्यांचं उत्पादन जास्त राहणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, देशात यंदा तीन कोटी टन काद्यांचं उत्पादन होईल. गेल्या वर्षी दोन कोटी 66 लाख टन कांद्यांचं उत्पादन झालं होतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai