राज्यात 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 मतदार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2023
- 364
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषित
नवी मुंबई ः भारत निवडणूक आयोग मार्फत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. याप्रसंगी सह-मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
4 ऑगस्ट 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पूर्व-पुर्नरिक्षण उपक्रम राबविण्यात आले होते. सदर कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण आणि प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे आदि सुधारणा करुन 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग, महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती आणि विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत नागरिकांकडून दावे-हरकती स्वीकारुन 26 डिसेंबर 2022 पर्यंत सर्व दावे-हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 71 लाख 35 हजार 999, महिला मतदारांची संख्या 4 कोटी 31 लाख 45 हजार 067 तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या 4 हजार 735 असून एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 आहे, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली. सदर यादीत नाव आणि इतर माहितीत दुरुस्ती केलेले पुरुष मतदार 1 लाख 52 हजार 254, महिला मतदार 1 लाख 6 हजार 287 तर तृतीयपंथीय 90 असे एकूण 2 लाख 58 हजार 631 मतदार आहेत. 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 42 हजार 301 इतकी होती. तर 5 जानेवारी 2023 नुसार त्यात वाढ होऊन ती 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 एवढी झाली आहे. एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या 6 लाख 77 हजार 483 इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात 15 हजार 332 ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai