Breaking News
15-20 टक्के भाडेवाढ
मुंबई ः येत्या 1 एप्रिलपासून स्कूल बसचे 15 ते 20 टक्के भाडेवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्क्रॅब पॉलिसी, एनआरई धोरण आणि सर्व स्पेअर पार्ट्स टायर, बॅटरीचे दर 12 ते 18 टक्यांनी वाढले आहे. त्यामुळे स्कूल बसचे भाडेवाढ करावी लागली असल्याची माहिती स्कुल बस असोशिएशनने दिली आहे. त्यामुळे आता पालकांना आणखी झळ सोसावी लागणार आहे.
मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या स्कूल बस मालकांना सध्या स्कूल बसच्या देखभालीचा खर्च वाढलेला आहे. त्यातच वाहतूक विभागाने सक्तीच्या केलेल्या नियमावलीमुळेही स्कूल बस चालकांना मोठा फटका बसत आहे. आता केंद्र सरकराने स्क्रॅब, एन युरो, एनआरई धोरणामुळे बसेस उत्पादक कंपनीने दीड ते दोन लाखांच्या दरात वाढ केली आहे. आता नवीन बसचे दर 28 लाख रुपये आहेत. मिनी बस टेम्पो प्रवास 21 लाख रुपये आहे. तसेच सर्व स्पेअर पार्ट्स टायर, बॅटरीचे दर 12 ते 18 टक्यांपर्यत वाढले आहेत. स्कुल बसवरील मजुरांच्या पगारात अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मुलांना सोडताना आणि घेताना आम्हाला पार्किंगवर 50 रुपयांचा दंड भरावा लागत आहेत. याशिवाय दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा सामना स्कुल बस चालकांना करावा लागत आहेत. त्यामुळे आमच्याकडे वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. येत्या 1 एप्रिलपासून स्कूल बसचे 15 ते 20 टक्के भाडेवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अशी माहिती स्कुल बस असोशिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai